आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांत सव्वा लाख मालमत्ताधारकांना नोटिसा, 22 हजार मालमत्तांना नव्याने लावला कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाॅर्डकार्यालयात कर्मचाऱ्यांची वानवा असली तरी गेल्या तीन महिन्यांत दोन लाखांपैकी एक लाख मालमत्ताधारकांना कराच्या नोटिसा बजावल्या आहेत. ३१ जुलैपर्यंत कर भरल्यास ऑगस्टपासून टक्के शास्ती म्हणजे दंड लागणार असल्याने नोटिसा देण्याचा वेग वाढवला आहे. एप्रिलपासून जेव्हा पालिकेकडून जाहीर प्रगटन दिले जाते, त्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. 

नागरिकांना कराच्या नोटिसीचीच प्रतीक्षा असल्याने पालिकेने नोटिसा तयार करून त्या वाॅर्ड कार्यालयाकडे रवाना केल्या आहेत.दरम्यान, पालिकेच्या वतीने मालमत्तांचे सर्वेक्षण कर आकारणीचे कामही सुरू आहे. या काळात २२ हजार नवीन मालमत्तांचे सर्वेक्षण करून कराची आकारल्याचे करमूल्य निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...