आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपास रोडवर आता असतील फक्त आठ वळणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बीड बायपास रोडवर रोज होणा-या अपघातांचे प्रमाण तसेच शहरातील जड वाहतूक या मार्गावरून वळवल्याने बीड बायपास रोडवर एमएसआरडीसी तसेच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाप्रमाणे अनधिकृतपणे उघडण्यात आलेले दुभाजक बंद करण्यात आले आहेत; परंतु शासनाच्या या निर्णयाला नागरिक आणि रिक्षाचालकांकडून विरोध होत असून बंद करण्यात आलेल्यापैकी काही दुभाजक सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कायम जड वाहनांची रहदारी असलेल्या बीड बायपास रस्त्यावर दुभाजक अनेक ठिकाणी फोडण्यात आले होते. संपूर्ण रस्त्यावर जवळपास ३८ ठिकाणी ओपनिंग (वळणे) होते. आदर्श लॉन्स, शहानगर, लकी हॉटेल या परिसरामध्ये काही किरकोळ अंतरावरच दुभाजकांना वळण होते. अनावश्यक वाढलेल्या ओपनिंगमुळे एमएसआरडीसीतर्फे दोन दिवसांपूर्वी संपूर्ण रस्त्यावरचे अनावश्यक दुभाजक बंद करण्यास सुरुवात करण्यात आली. काही नागरिकांकडून विरोध होत असला तरी परिसरातील अनेक नागरिकांनी व रस्त्यावरील व्यापा-यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे; परंतु बजाज हॉस्पिटलमध्ये अनेकदा लांबून अॅम्ब्युलन्स येतात.

जालन्याकडे जाणा-या दिशेकडून अॅम्ब्युलन्स आल्यास तिला थेट एमआयटी चौकातून वळण घेऊन हॉस्पिटलमध्ये यावे लागणार आहे. इतर ठिकाणी फारशी अडचण नसली तरी हॉस्पिटल व मोठ्या वसाहतीच्या ठिकाणी दुभाजक व गतिरोधक करून वळण करण्याची मागणी शिवसेनेचे राजेंद्र राठोड, भाजपचे ज्ञानेश्वर बोरसे, संजय मेडे, राजेश जंगले, सचिन चौधरी, आकाश बिराजदार, हरिभाऊ हिवाळे, राजेंद्र वाघ यांनी केली आहे.

पोलिस आयुक्तांनी ४ ओपनिंग ठेवण्याचे दिले आदेश
>एमएमआरडीसीतर्फे टेंडर व इतर आवश्यक गरजेनुसार आठ ठिकाणी ठेवणार ओपनिंग
>पूर्वी एकूण ३८ ठिकाणी होती ओपनिंग आता आठ ठिकाणीच ओपनिंग
>मागील एका महिन्यात १० पेक्षा अधिक अपघात, चाैघांचा मृत्यू
>नियमानुसार दुभाजक बंद केल्याचे विभागाचे स्पष्टीकरण

नाईकनगर, माउलीनगर येथे वळण शक्य नाही
नाईकनगर, माउलीनगर येथील नागरिकांनीसुद्धा दुभाजकाला ओपनिंग देण्याची मागणी केली; परंतु नाईकनगर, माउलीनगर येथे चौकात वळण व उतार आहे. वळण व उतारामुळे वाहनांची गती वाढत असल्याने तेथे वळण अशक्य आहे. देवळाई चौकातून नाईकनगर, माउलीनगरचे अंतर ११०० मीटर आहे. तांत्रिक कारणामुळे अनेक ठिकाणी ओपनिंग देऊ शकत नाही. सर्व कामे आयआरसीच्या नियमाप्रमाणे व पोलिस आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे सुरू असल्याचे एमएसआरडीसीचे शाखा अभियंता सुनील कोळसे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...