आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषणच्या देखरेखीसाठी यंत्रणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शालेयपोषण आहार योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि देखरेखीसाठी इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (आयव्हीआरएस) यंत्रणा वापरण्यात येणार आहे. या सिस्टिमच्या माध्यमातून शाळेत खिचडी शिजली की नाही, किती विद्यार्थ्यांनी खिचडीचा आस्वाद घेतला, यावर थेट देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक शाळेचा अहवाल रोज संकेतस्थळावर पाहण्याची सोय करून देण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय पोषण आहाराचे केंद्रीय मुख्य सचिव गयाप्रसाद शर्मा यांनी दिली. मिड-डे मिलसंदर्भात विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, केंद्र शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबवण्यात येते. या योजनेत गैरप्रकार केले जात असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या योजनेत काही त्रुटीही आढळून आलेल्या आहेत. शालेय पोषण अाहाराचा लाभ योग्य प्रकारे विद्यार्थ्यांना घेता यावा, यातील अडचणी दूर व्हाव्यात आणि चांगली देखरेख ठेवता यावी, यासाठी केंद्र शासनातर्फे ही योजना आयव्हीआरएसशी जोडण्यात येणार आहे. त्यात नोंदणी करण्यापासून ते सर्व हिशेब ठेवण्याची कामे केली जाणार आहेत.

काय आहे आयव्हीआरएस ?
इंटरअॅक्टिव्हव्हॉइस रिस्पॉन्स (आयव्हीआरएस) ही अशी प्रणाली आहे, ज्यात प्रत्येक शाळेत किती विद्यार्थी उपस्थित आहेत, खिचडी किती शिजवली, किती जणांना त्याचा लाभ मिळाला याची नोंद रोज मोबाइलवर एसएमएसद्वारे घेता येईल. हा डेटा राज्यनिहाय विभागणी करून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक शाळेत एका शिक्षकाकडे ही जबाबदारी देण्यात येणार आहे. तशा सूचनाही शिक्षण विभाग आणि जि.प.शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे गयाप्रसाद शर्मा यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...