आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्हैसमाळमध्ये आता पर्यटकांकरिता एसी तंबूची सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - म्हैसमाळमध्ये पर्यटकांना राहण्यासाठी आता वातानुकूलित तंबूची सुविधा मिळणार आहे. शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात म्हैसमाळ प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. यामध्ये येत्या तीन आठवड्यांत १२ एसी तंबू तयार करण्यात येणार आहेत. तसेच दौलताबाद आणि खुलताबाद येथील तलावात बोटिंगची सुविधादेखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.

म्हैसमाळ, शूलिभंजन, वेरूळ, खुलताबाद अशा पर्यटनस्थळांसाठी ही प्राधिकरण समिती नेमण्यात आली आहे. या बैठकीस विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, आमदार प्रशांत बंब यांच्यासह एमटीडीसी, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना बंब म्हणाले, प्राधिकरण समितीची ही दुसरी बैठक आहे. यात म्हैसमाळ तसेच खुलताबाद परिसरात पर्यटनवाढीसाठी सुविधांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये एमटीडीसीने नेमलेल्या कन्सल्टंटला या चारही भागांतला एकात्मिक आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच म्हैसमाळमध्ये पर्यटनवाढीसाठी १२ तंबू उभारण्यात येणार आहेत. येत्या तीन आठवड्यांत त्यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि पर्यटनवाढीला चालना मिळेल. तसेच या ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून द्यावेत यासाठीदेखील चर्चा करण्यात आली. यामध्ये शिवना टाकळी प्रकल्पातून पाइपलाइन तसेच बालाजी मंदिराजवळ गिरिजादेवी येथे बंधारा बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास साडेआठ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे.