आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता थेट कडक कारवाई: नो पार्किंगमधील चारचाकी वाहने क्रेन लावून उचलणार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतूक पोलिसांनी गुरूवारी दुचाकीस्वारकांवर कारवाई केली. - Divya Marathi
वाहतूक पोलिसांनी गुरूवारी दुचाकीस्वारकांवर कारवाई केली.
औरंगाबाद- दिवसेंदिवस शहराच्या बिघडत चाललेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता पोलिस विभागाने मोठी माेहीम हाती घेण्याचे ठरवले आहे. एकीकडे पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवाईवर वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत असताना आता सौजन्याची भाषा पुरे झाली, आता थेट कडक कारवाई करूनच वाहतूक नियम पाळायला लावू, अशी प्रतिक्रियाच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयात गुरुवारी वाहतूक अधिकाऱ्यांची बैठकदेखील पार पडली. 

बुधवारी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी अमरप्रीत चौक, बाबा पेट्रोल पंप चौक (भगवान महावीर चौक), रेल्वेस्टेशन आदींसह महत्त्वाच्या चौकांची पाहणी केली. या ठिकाणांसंदर्भात अनेकदा तक्रारी येत असल्याने घाडगे यांनी अचानक भेट देत पाहणी केली. या दरम्यान त्यांनी काही ठिकाणांवर वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले पाहून तीव्र नाराजी व्यक्त करत कर्मचारी, अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले. हेल्मेटसक्ती, सीटबेल्टसह सिग्नल तोडणे, राँग साइड (उलट दिशेने) होणारी वाहतूक आदींसंदर्भात कारवाई हाेत असली तरी काही ठिकाणी यात हलगर्जीपणा होत असल्याचे समोर आले. यात प्रामुख्याने शहरातील सर्व भागांमध्ये चारचाकी चालकांकडून खुलेआम भर रस्त्यावर कार उभी केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोेंडी होत असल्याची नोंद अधिकाऱ्यांनी केली. यात उस्मानपुरा, निराला बाजार, कॅनॉट प्लेस परिसर, औरंगपुरा, रेल्वेस्टेशन आणि बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये सर्रास रस्त्यावर चारचाकी तसेच जड वाहने उभी केली जातात. त्याच्यावर अंकुश लावण्यासाठी आता वाहतूक विभागाला सक्त आदेश देण्यात आले आहेत. 

मनपाचे असहकार्य...
सिग्नलवरील क्रॉसलाइन, मार्जिन लाइन आदी नियमांसंदर्भात कारवाई करण्यात येत नाही. क्रॉस लाइन आणि मार्जिन करून देण्यासाठी तीन वेळेस पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु अद्याप मनपाकडून उत्तर आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पत्राला उत्तर येत नसल्याचे सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांना पालिकेत जाऊन भेटण्यासाठी पाठवण्यात आले होते. परंतु तरीही रस्त्यावरील आवश्यक सोयी-सुविधा मनपा देत नसल्याने वाहतूक विभागाला कारवाई करणे अशक्य होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चारचाकी उचलण्यासाठी १० हायड्रोलिक क्रेन 
नॉनपार्किंग भागात उभ्या कारवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे क्रेन कमी आहेत. त्यामुळे कारवाई करता येत नसल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितले. ही बाब समाेर येताच तत्काळ दहा हायड्रोलिक क्रेन मागवा, असे आदेश डॉ. दीपाली धाटे यांनी दिले. गुरुवारी कारवाईचे नियोजन करण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...