आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद होणार हेरिटेज सिटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वारसास्थळे असून त्यांची अवस्था वाईट आहे. याची दखल घेत जपान सरकारकडे या शहरांचा हेरिटेज सिटीत समाविष्ट करण्याचा पाठपुरावा जपानमधील औरंगाबादच्या नागरिकांनी सुरू केला आहे. वाराणसीनंतर औरंगाबाद लवकरच जपानच्या यादीतील दुसरी हेरिटेज सिटी ठरणार आहे.

महास्वच्छता अभियानानिमित्त काही जपानी नागरिक नुकतेच शहरात आले होते. अभियानातील प्रमुख समन्वयक चैतन्य भंडारी या मराठी तरुणाने याबाबत पुढाकार घेत ही गोड बातमी औरंगाबादच्या नागरिकांना दिली आहे. भंडारी यांनी नुकतीच महापौर कला ओझा यांची भेट घेऊन जपान सरकारची योजना समजावून सांगितली. जपानने जगभरातील २६ शहरांची निवड करून त्यांचा हेरिटेज सिटी म्हणून विकास करण्याचे घोषित केले आहे. वाराणसीनंतर आता औरंगाबादचा समावेश करावा या मागणीचे पत्रे भंडारी हे जपान सरकारला देणार आहेत. त्यासाठी महापौरांकडून एक संमतिपत्र भंडारी यांनी शुक्रवारी घेतले.

काय आहे योजना
दी वर्ल्ड लीग ऑफ हिस्टॉरिक सिटीज ही संस्था जगभरातील वारसास्थळे असलेल्या शहरांची संघटना आहे. यात जगातील २६ शहरांचा समावेश आहे. ऐतिहासिक शहरांशी मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करणे, जागतिक वारसास्थळांच्या माहितीची देवाण-घेवाण करणे असा या संस्थेचा उद्देश आहे.

वर्षाला मिळणार दहा कोटी रुपये
औरंगाबाद शहराचे नाव या यादीत जपान सरकारने घेतले तर वर्षाला दहा कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळेल. यातून शहराच्या पायाभूत विकासासह वारसास्थळांचा विकास करता येणार आहे. पण दरवर्षी या योजनेसाठी पुनर्नोंदणी करावी लागणार आहे. काय विकास केला ते दाखवावे लागणार आहे.

आपले शहर वारसास्थळांचा खजिना
मी औरंगाबाद शहरात वाढलोय. त्यामुळेच या शहराची ओढ आहे. आपल्या शहरात बरीच जागतिक दर्जाची वारसास्थळे आहेत. पण त्याची दुरवस्था आहे. त्यांच्या देखभालीसह मार्केटिंग व्हावे म्हणून हा प्रस्ताव मी जपान सरकारकडे देणार आहे. तो लवकरच मान्य होईल अशी अपेक्षा आहे. जपानी लोकांना औरंगाबाद खूप आवडते. चैतन्य भंडारे, अनिवासी भारतीय,जपान