आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता देशातला काळा पैसाही बाहेर काढणार, मुख्य आयकर आयुक्त एस. सी. शुक्ला यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशातील प्रत्येक शहरात आयकर लपवणाऱ्या काळा पैसा बाळगणाऱ्यांचा डाटा आयकर विभागाच्या क्रिमिनल विंगने जमा केला आहे. सरकारने सवलत जाहीर केल्यावरही लपवेगिरी केल्यास कारवाईसाठी कोणताही दबाव कामी येणार नाही. त्यामुळे आता अजून वेळ आहे, फायदा घ्या, नसता खरे नाही, असा इशारा आयकर विभागाचे मुख्य आयुक्त एस. सी. शुक्ला यांनी करबुडव्यांना दिला.

‘दिव्य मराठी’शी बोलताना शुक्ला यांनी सरकारचे आयकर धोरणही स्पष्ट केले. ते म्हणाले, आता स्वत:ची जाहीर केलेली संपत्ती सरकारदरबारी जाहीर करण्याची नामी संधी आहे. जून ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ही संधी देण्यात आली आहे. या मुदतीनंतर मात्र आमची क्रिमिनल विंग कामाला लागेल. आतापर्यंत विदेशातील काळ्या पैशावर सरकारचे लक्ष होते. २०१६ च्या नव्या धोरणानुसार सरकार स्वदेशातील काळा पैसा बाहेर काढणार आहे.
दंडात्मक अन् फौजदारी कारवाई : सप्टेंबर२०१६ नंतर सरकारने दिलेली सवलत संपत आहे. त्यानंतर मात्र दंड आणि फौजदारी कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी आपली संपत्ती संपूर्णपणे जाहीर केली नसेल किंवा पैशाची पूर्ण नोंद आयकर विभागाकडे केली नसेल त्यांना ही शेवटची संधी असल्याचे आयकर आयुक्तांनी स्पष्ट केले.
संघटनेच्या वतीने स्वागत : सी.ए. संघटनेच्या सातारा भागातील भव्य सभागृहात बुधवारी मुख्य आयकर आयुक्त शुक्ला हे खास नाशिक येथून आले होते. भारत सरकारच्या धोरणानुसार आयकर आयुक्त प्रत्येक जिल्ह्यात सी. ए. संघटनेच्या कार्यक्रमांना हजर राहून 'आय प्रकटीकरण योजना २०१६’ची माहिती देत आहेत. सायंकाळी सात ते आठ या वेळेत त्यांनी शहरातील सर्व चार्टर्ड अकाउंटंट ,व्यापारी, उद्योगपती यांच्याशी संवाद साधून डिजिटल प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. या वेळी व्यासपीठावर औरंगाबादचे आयकर आयुक्त एल. जी. श्रीवास्तव, सी. ए. संघटनेच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे- बोरामणीकर, सीएमआयचे अध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा, मसिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या वतीने शुक्ला यांचा सत्कार करण्यात आला.
जुन्या पैशाचे नवे रिटर्न
शुक्ला म्हणाले, यापूर्वी सलग सहा वर्षांच्या बॅलन्सशीट संपल्या की जाहीर करायच्या राहून गेलेल्या पैशाचे रिटर्न भरण्याची सोय नव्हती. पण आता कितीही जुनी पैशाची नोंद हुडकून काढून त्याचा चालू वर्षात ताजा रिटर्न भरता येईल.
बातम्या आणखी आहेत...