आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट‌्सअॅप ग्रुपवर आता सायबर सेलची नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोबाइल व सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी, जाती-धर्मांत तेढ निर्माण करणारा व बदनामी करणारा प्रचार होऊ नये यासाठी पोलिसांचा सायबर सेल लक्ष ठेवणार
आहे. त्यामुळे वॉर्डावॉर्डांत निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या व्हॉट्सअॅपच्या ग्रुप्समध्ये काय चालले आहे, हे पोलिसांना तातडीने कळणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलचे काम वाढले आहे. औरंगाबाद शहरात सोशल मीडियात व्हॉट्सअॅपचा वापर होत असल्याचे समोर आले असून त्या खालोखाल फेसबुकचा वापर होत आहे.

कुठलीही शहानिशा न करता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अफवा व खोटीनाटी माहिती पसरवण्यात आल्याचे काही प्रकार समोर आल्याने निवडणुकीच्या काळात यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी पोलिसांचा सायबर सेल सोशल मीडियावर काय चालले आहे यावर बारीक नजर ठेवून असल्याचे सांगितले. कोणताही अप्रिय व अयोग्य प्रकार घडला, तर तत्काळ कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

प्रचाराचा रतीब
जवळपास प्रत्येक वॉर्डात इच्छुकांनी व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून शेकडो मतदारांच्या मोबाइलवर प्रचाराचा रतीब घालायला सुरुवात केली आहे. त्यात प्रतिस्पर्धी पक्ष व उमेदवारांच्या संदर्भातील टीकाटिप्पणीही सुरू झाली आहे. हा प्रकार विखारी, जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्यापर्यंत पोहाेचू नये, यासाठी पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून सज्ज झाली आहे.