आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहावीचा अभ्यासक्रमात मिळेल भेसळयुक्त अन्नाची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रात्यक्षिक अनुभवातून, कृतीयुक्त विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवण्याच्या उद्देशाने सहावीच्या पाठ्यपुस्तकांची रचना करण्यात आली असून अतिशय साध्या, सोप्या आणि विज्ञान हेच थीम बेस करण्यात आले आहे. शिवाय अन्नातील भेसळ कशी ओळखावी, याची माहिती प्रात्यक्षिकांसह आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार राज्यात प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ तयार करण्यात आला. या अभ्यासक्रमाची कार्यवाही २०१३-१४ या शालेय वर्षापासून सुरू झाली. त्याअंतर्गत या वर्षी वर्ग सहावीचे विज्ञान पुस्तक हे "थीम बेस' असणार आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांना आवडतील, त्यांची आकलन क्षमता वाढेल, अशा पद्धतीने त्यांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच विज्ञान आणि संशेाधनाची गोडी निर्माण करणाऱ्या विज्ञानातील गमतीजमती विद्यार्थी प्रत्यक्ष उलगडणार आहेत, अशी माहिती विज्ञान विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य गजानन सूर्यवंशी यांनी दिली. यंदाच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे क्यूआरडी कोड पुस्तकावर देण्यात आले आहेत. जेणेकरून ऑनलाइन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातूनही पुस्तके हाताळता येणार आहेत. त्यांच्या पूर्वज्ञानाच्या आधारावर या पुस्तकाच्या साहाय्याने ज्ञानरचना करू शकणार आहेत. तसेच छोट्या उपक्रमांतून हे असे का घडते, दूध भेसळ काय, अन्नात भेसळ, कशी ओळखावी आदी प्रश्नांची उकल प्रात्यक्षिक अनुभव शिक्षणरचनेत केली आहे.

अशा आहेत कृती :
हेनेहमी लक्षात ठेवा, पोषण आहार म्हणजे काय, कशातून काय मिळते अशा प्रत्येक विषयासंबंधीची माहिती प्रयोगातून शिक्षणाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकात देण्यात आली आहे. तसेच आजवर खगोलशास्त्राचा संबंध हा केवळ भूगोलाशी जोडण्यात आला, परंतु खगोलशास्त्र हे विज्ञानाशी संबंधितच आहे. त्यामुळे विज्ञानात खगोलशास्त्राच्या भौतिक विज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.


इंग्रजी शब्दावली :
विज्ञानाच्यापुस्तकात आजवर इंग्रजी शब्दांची पारिभाषिक शब्दावली. अर्थात, विज्ञानात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे मराठी अर्थ पुस्तकाच्या मागच्या बाजूस इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत देण्यात आले आहेत.

यंदाचे विज्ञानविषयाचे पुस्तक हे सीबीएसईच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तसेच आज वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी करावा. त्यासाठी प्रत्यक्षात कृती व्हावी. या उद्देशाने थीम बेस विज्ञान करण्यात आले आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी इंटरनेटचादेखील वापर करायचा आहे. विज्ञान आणि संशोधनाची गोडी निर्माण होण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. गजाननसूर्यवंशी, विज्ञानअभ्यास मंडळ सदस्य.
बातम्या आणखी आहेत...