आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य केंद्रांचे अकाउंट फेसबुकवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्मार्टफोन्सचावाढता वापर अाणि संगणकाची उपलब्धता यामुळे ग्रामीण भागातही इंटरनेटचे जाळे वेगाने पसरत आहे. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अकाउंट फेसबुकवर उघडण्याची संकल्पना मांडली असून यामुळे नागरिकांना तक्रारी, सूचना किंवा आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सगळ्यांना मिळू शकते.

सध्याच्या हायटेक जमान्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांनीही हायटेक होऊन आपल्या केंद्रात केलेल्या कामांची माहिती फेसबुकवर टाकावी. त्यावर नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांतून अधिक सुधारणा करता येतील, हा या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या अंतर्गत २२ प्रकारच्या मुख्य सुविधा दिल्या जातात. या सुविधांची माहिती संबंधित आरोग्य केंद्रांकडून फेसबुकवर टाकायची आहे. त्यात इमारत बांधकाम, पाण्याची सुविधा, बेडची व्यवस्था, औषधांची उपलब्धता, उपलब्ध उपकरणे आाणि साहित्य, कर्मचाऱ्यांची माहिती, अंतर्गत रस्ते, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची भेटी त्यांनी केलेल्या सूचना, आदी माहिती यात असेल. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आरोग्य केंद्रातील कर्मचारी अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे. तसेच कोणत्याही नागरिकाला प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती हवी असल्यास ती तत्काळ उपलब्ध होऊ शकते.

फेसबुकवर अकाउंट सुरू करण्याचे आदेश
आरोग्यविभागाच्या वतीने प्रत्येक आरोग्य केंद्रात फेसबुक अकाउंट खोलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना तशा सूचना केल्या आहेत. डॉ.बी.टी. जमादार, जिल्हाआरोग्य अधिकारी

लोकप्रतिनिधी येतील भेटीला शासनआदेशाप्रमाणे करण्यात आलेल्या कामांची माहिती त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आाणि सूचना फेसबुकवर टाकाव्या लागणार आहेत. यात आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि अन्य लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.