आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्मार्ट’च्या ग्रीनफील्डमध्ये यंदा नक्षत्रवाडीच टार्गेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादचा जुनाच प्रस्ताव नवीन रूपात सादर करताना त्याआधी उचलेल्या पावलांचा फायदा या वेळी होण्याची चिन्हे आहेत. केवळ प्रस्तावातील चिकलठाण्याच्या ग्रीनफील्डवर अवलंबून राहता मनपाने यासोबतच आपल्या बळावर नक्षत्रवाडीतही ग्रीनफील्ड करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचाही फायदा होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेचा पहिला प्रस्ताव का नाकारण्यात आला याबाबत जाहीर बोलता आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी गतवेळच्या चुका टाळून त्यात सुधाारणा करून नवीन प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले.

मागचे काय चुकले याबाबत माहिती घेतली असता असे समोर आले की, मनपाचा पहिला प्रस्ताव हा अतिशय प्राथमिक पातळीवरचा होता. शहराच्या विकासात भर टाकणारा, पण आतापर्यंत वापरल्या गेलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेले नव्हते. ज्या गोष्टी स्मार्ट सिटीतून करावयाच्या आहेत त्यासाठी आपल्या पातळीवरही काहीच सक्रिय काम करण्यात आले नव्हते. याचा परिणाम असा झाला की मनपा फक्त निधीची मागणी करण्यासाठीच प्रस्ताव सादर करीत आहे असा ग्रह झाला. परिणामी पहिल्या टप्प्यातून नाव गळाले. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया पुण्यात असताना पुण्याचा आराखडा तयार करण्यात सहभागी झाले होते. त्यांनी औरंगाबादचा प्रस्ताव नव्याने तपासला त्यात पर्यटनावरच फोकस करण्याचा निर्णय घेतला लगेच त्यासाठी पुढील पावले उचलली आहेत.

मनपा आयुक्त बकोरिया लवकरच बैठक बोलावणार
चिकलठाण्यातीलशेतकऱ्यांचा आक्षेप त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आयुक्त बकोरिया लवकरच एक बैठक आयोजित करणार आहेत. सध्या शहराबाहेर असलेले आयुक्त सोमवारी शहरात परतत असून ते या आठवड्यात त्यावर निर्णय घेणार आहेत. नक्षत्रवाडीत ग्रीनफील्डसाठी लागणाऱ्या जागेपैकी ८० टक्के जागा शासकीय असल्याने ती सहज मिळेल. शिवाय चिकलठाण्यात काही अडथळे आले तर लगेच दुसरा पर्यायही हाती ठेवण्याचा हा मनपाचा प्रयत्न आहे. चिकलठाण्यातील मार्ग मोकळा झाला तर नक्षत्रवाडी हा मनपासाठी बोनस ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...