आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांना भेटण्यासाठी आता घाटीत पास पद्धत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घाटीतील निवासी डाॅक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे असुरक्षितता निर्माण झाली असून यापुढे रुग्णांना भेटण्यासाठी पास पद्धत सुरू करण्यात येणार आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजता वाॅर्ड क्रमांक सहामध्ये डाॅ. नीलेश वाघ आणि डाॅ. विनोद तातेवाड यांना मारहाण करण्यात आली. अस्वच्छतेचे कारण पुढे करत सात ते आठ जणांनी दोन्ही डाॅक्टरांवर हल्ला चढवला. या घटनेनंतर सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा, पोलिस नागनाथ कोडे, अधिष्ठाता डाॅ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुहास जेवळीकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
भोकरदन येथील ६६ वर्षीय दगडाबाई सुकडाजी साबळे यांना ३१ जुलै रोजी रात्री ११ वाजता दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिसार झाल्यामुळे प्रकृती खालावली आणि त्यांचा आॅगस्टच्या रात्री मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे नातेवाईक वाॅर्डात दाखल झाले आणि डाॅक्टरांशी वाद घालून मारहाण केली. डाॅक्टरांनी संप पुकारू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. रुग्णांच्या नातेवाइकांना पास देण्याची पद्धत सुरू करण्यात यावी, असा तोडगा काढण्यात आला. मृत व्यक्तीच्या भोवती मुंग्यांचा थर असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.
बातम्या आणखी आहेत...