आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारितेत आता सहा प्रकारचे स्पेशलायझेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद वृत्तपत्रविद्या विभागातील सर्व अभ्यासक्रमांत यंदा बदल करण्यात आले आहेत. सर्व अभ्यासक्रमांमध्ये दुसऱ्या वर्षात स्पेशलायझेशन शिकवले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकारितेच्या कसोटीवर टिकणारे अभ्यासक्रम तयार झाल्यामुळेच यंदाच्या ‘जेट-२०१६’ साठी जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, गुजरात, नवी दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांसह सर्वच ठिकाणांहून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या चॉइस बेस्ड क्रेडिट अँड ग्रेडिंग सिस्टिमनुसार पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. पत्रकारितेसाठी मात्र मागील दोन दशकांपासून प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येत होती. विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी यंदा अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली आहे. जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांच्या पातळीवर बदल केल्याने पत्रकारितेचा अभ्यासक्रम देशाच्या सीमारेषा ओलांडण्याची शक्यता आहे. एमएच्या अभ्यासक्रमातदेखील एमबीएप्रमाणे स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी देण्यात येणार आहे. एमए (एमसीजे) चे पहिले वर्ष सर्वसाधारण राहील. दुसऱ्या वर्षात मात्र प्रिंट जर्नालिझम, रेडिओ जर्नालिझम, टीव्ही जर्नालिझम, जनसंपर्क कॉर्पोरेट कम्युनिकेशन अॅडव्हर्टायझिंग आदी विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी देण्याची तयारी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची तयारी केली आहे. बीए (जेएमसीजे), बीए (ऑनर्स जर्नालिझम), बीए (ऑनर्स) मल्टिमीडिया मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमांसाठीदेखील ‘जेट’ त्यानंतर ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू घेऊनच प्रवेश देण्यात येणार आहे.

आज जेट परीक्षा, उद्या गटचर्चा
विभागातच१७ आणि १८ जून रोजी ‘जेट’ घेण्यात येणार आहे. एमएची गटचर्चा मुलाखती १८ जून रोजी ११ ते दरम्यान दुपारी होणार आहेत. बीए (जेएमसीजे), बीए (ऑनर्स जर्नालिझम), बीए (ऑनर्स) मल्टिमीडिया मास कम्युनिकेशन, एमए (जेएमसी), एमए (रेडिओ जर्नालिझम), एमए (टीव्ही जर्नालिझम), एमए (अॅडव्हर्टायझिंग), एमए (पब्लिक रिलेशन अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन) या अभ्यासक्रमांसाठी दुपारी १२ ते या वेळेत ‘जेट’ परीक्षा होईल.