आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट सिटीला आता ‘ई-गव्हर्नन्स’ची जोड, पुण्याची कंपनी वर्षभर देणार मनपा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असून विकासाची गती वाढवण्यासाठी शासनाने मनपाला ई-गव्हर्नन्सची जोड देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आयटीचे काम करणाऱ्या ‘अनर्स्ट यंग’ या कंपनीला ई-गव्हर्नन्सच्या कामासाठी निवडले आहे. पुण्याच्या धर्तीवर ही निवड करण्यात आली आहे. नागपूर मनपा आणि पुण्याच्या पीडब्ल्यूडीमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. एक वर्षासाठी मनपातही ही कंपनी ई-गव्हर्नन्सचे काम करणार आहे. त्यामुळे नागरिकांना मनपाचा कारभार, निर्णय आणि इतर सर्व माहिती घरबसल्या कळेल. महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीचा प्रस्ताव नुकताच शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागार समितीने तयार केलेल्या सादरीकरणात मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी औरंगाबाद महानगरपालिकेत २००६ पासून सुरू असलेले ‘ई-गव्हर्नन्स’ आणखी हायटेक करण्याची सुचना केली होती. त्यानुसार सादरीकरणातील गव्हर्नन्स बाबतही राज्य शासनाच्या विशेष समितीसमोर स्मार्ट सिटीचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाचे कौतुक करून शहरासाठी आयटीचे काम करणाऱ्या चार खासगी कंपन्यांची नावे राज्य शासनाने सुचवली होती. त्यानुसार आयुक्त बकोरिया यांनी राज्याची उपराजधानी नागपूरच्या मनपाचे काम करणाऱ्या पुण्यासह पीडब्ल्यूडीचे काम करणाऱ्या कंपनीची निवड नुकतीच केली.
स्मार्ट शहरासाठी सुविधा
शहराचा समावेश स्मार्ट सिटीत होण्यासाठी नागरिकांनाही स्मार्ट बनवण्याची गरज आहे. शासनाच्या सूचनेनुसार नागपूर पुण्यात आयटीचे काम करणाऱ्या अनर्स्ट यंग कंपनीची यासाठी निवड करण्यात आली अाहे. ओमप्रकाशबकोरिया, मनपा आयुक्त

वर्षभरासाठी निवड
या कंपनीची निवड एक वर्षासाठी करण्यात येणार असून कंपनीची निश्चित मोबदला अद्याप ठरलेला नाही. मात्र कंपनीला या कामासाठी जो खर्च येईल तो सीएसआर अॅक्टिव्हिटीमधून देण्याचा आयुक्त प्रयत्न करणार आहेत. मनपाच्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट काम करण्यासाठी या संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

काय करेल कंपनी
गव्हर्नन्सचे काम करणा ऱ्या ‘अनर्स्ट यंग’ कंपनीकडून शहरातील नागरिकांना मनपाकडून मिळणाऱ्या सर्व सुविधांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मनपाची अंतर्गत माहिती वगळता सर्व अहवाल निर्णय, नोटिसा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याच बरोबर नागरिकांच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि इतर सुविधांबाबतही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...