आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोंढा नाका उड्डाणपुलाचे उद्घाटन आता 1 ऑगस्टला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळाल्याने मोंढा नाका उड्डाणपुलाचे २५ जुलै रोजी होणारे उद्घाटन आता एक ऑगस्टला होणार आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी वेळ देण्याची तयारी दाखवल्याने शनिवारी उद्घाटन होणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने एक ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्याचे ठरले आहे. परिणामी, पुलाचे काम पूर्ण झाले, तरी वाहने धावण्यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.