आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता ४२ केंद्रांवर भरा वीज बिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महावितरणने घरबसल्या वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइन सुविधेबरोबरच पॉवर हाऊस, क्रांती चौक, छावणी, वाळूज, एन सिडको, पन्नालालनगर आणि शहागंज येथे एनी टाइम पेमेंट मशीन बसवल्या आहेत. ही एटीपीसेवा २४ तास आणि सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. तसेच ४२ केंद्रांवर वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा शहरातील लाख ६६ हजार वीज ग्राहकांना फायदा होणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात तीन एटीपी मशीन बसवल्या होत्या. यावर २८ केंद्रे सुरू करण्यात आली होती. अडीच लाख ग्राहकांसाठी ही सेवा अपुरी पडत असल्याचे लोकप्रतिनिधींनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिले होते. यावर ऊर्जामंत्र्यांनी ५० वीज बिल भरणा केंद्रे सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार मशीनची संख्या वाढवण्यात आली.
असे भरा वीज बिल
एटीपीमशीन संगणकाशी जोडलेले आहे. शहरातील संपूर्ण अडीच लाख वीज ग्राहकांची नोंद संगणकाशी जोडलेली आहे. मशीन जवळ वीज बिल पकडले असता संपूर्ण माहिती स्क्रीनवर येते. ती माहिती भरल्यानंतर कॅशद्वारे भरणा करावा. तत्काळ त्याची पावती तुमच्या हातात मिळते. त्याच क्षणी ती माहिती संगणकावर नोंदली जाते.