आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजिंग औरंगाबादशी विमानाने जोडण्याच्या हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अौरंगाबाद- चीनचे उपराष्ट्रपती ली युआन चाओ यांच्या औरंगाबाद भेटीमुळे आगामी काही महिन्यांत चिनी पर्यटकांचा ओघ औरंगाबादेत वाढण्याची शक्यता आहे. दोन देशांतील बौद्ध संस्कृतीतील साम्य हे पर्यटनवाढीसाठी उपयुक्त असल्याने सध्या सुरू असलेली बीजिंग-मुंबई विमानसेवा औरंगाबादमार्गे वळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

विदेशी पर्यटकांसाठी आग्र्याचा ताजमहाल अजिंठा-वेरूळच्या लेणी हेच प्रमुख आकर्षण असते. मागील काही वर्षांपासून विदेशी पर्यटकांची संख्या घटत असताना पर्यटनवृद्धीसाठी नवीन पर्यायांचा शोध गरजेचे बनले आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून चीनसोबतचे संबंध सुधारत असल्याने तेथे मोठी क्षमता दिसून येत आहे. बीजिंग औरंगाबादशी विमानाने जोडण्याच्या हालचाली मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चीन दौऱ्यात पर्यटनावर सखोल चर्चा झाली. एवढेच नाही, तर फडणवीस यांनी औरंगाबाद चीनमधील डनहुआंग या दोन शहरांना असलेला बुद्ध लेणींचा समान वारसा पाहता त्यांच्यात सिस्टर सिटीचा करार केला. त्यातही या दोन शहरांत पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी चीनचे उपराष्ट्रपती ली युआन चाओ भारत दौऱ्यावर आले. त्यांची पहिली भेट थेट औरंगाबादलाच होती. अजिंठा लेणी पाहून त्यांनी चीन भारतातील समान सांस्कृतिक ठेव्याचा पर्यटनवाढीसाठी चांगला फायदा होईल, असे म्हणत आगामी काळात पर्यटकांचा ओघ सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यानच औरंगाबादहून चीनसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास पर्यटकांना थेट येणे- जाणे सोपे होऊ शकते, असे चर्चेदरम्यान समोर आले. राज्याच्या पर्यटन मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात ते शक्य होणार आहे, असेही सांगण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्या दौऱ्यांदरम्यान व्यापार पर्यटन या दोन क्षेत्रांत पुढचे पाऊल उचलण्याचे ठरले. त्या अनुषंगाने कार्यवाहीही सुरू झाली आहे.

औरंगाबादमार्गे मुंबई विमानसेवा
चीनच्याएअर चायना या प्रमुख विमान कंपनीने २५ आॅक्टोबरपासून बीजिंग-मुंबई ही थेट विमानसेवा सुरू केली आहे. महाराष्ट्रात चीन करत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने ही थेट विमानसेवा फायद्याची ठरणार आहेच, पण त्याचा पर्यटनालाही खूप फायदा होणार आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने एअर चायना चिनी सरकारकडे बीजिंग-मुंबई विमान औरंगाबादमार्गे नेण्याची विनंती केली असून लवकरच तसा निर्णय होण्याची शक्यता आहे. चिनी उपराष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय विमानसेवेची एक चाचणीच पार पडली. ली थेट अफगाणिस्तानातून औरंगाबादेत आले. त्यांच्यासाठी त्यांच्या ताफ्यातील अधिकारी मंत्र्यांसाठी विशेष इमिग्रेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

-औरंगाबादेत वर्षभरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाख असून त्यात विदेशी पर्यटकांची संख्या ५० हजार आहे.

एक नजर चिनी पर्यटकांवर
-२०१२ च्या आसपास चीनच्या पर्यटकांनी विदेशात जाण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून चिनी पर्यटकांच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत आहे.
-याच काळात विदेशात भटकंती करणाऱ्या चिनी पर्यटकांची संख्या कोटीवरून १० कोटींवर गेली आहे.
-२०१३ या वर्षात चिनी पर्यटकांमुळे जगात १२९ अब्ज डाॅलर्सची उलाढाल झाली.
-२०१३ पर्यंत हाँगकाँग, थायलंड, मकाऊ, दक्षिण कोरिया जपान ही चिनी पर्यटकांची आवडती स्थळे होती. पण गेल्या वर्षभरात युरोप, इजिप्तकडेही पर्यटकांनी मोहरा वळवला.
-२०१४ मध्ये भारतात आलेल्या ७० लाख विदेशी पर्यटकांत चिनी पर्यटकांची संख्या अवघी टक्के म्हणजे लाख १० हजार आहे.शहरात येणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

महाराष्ट्राचे चीनमध्ये ब्रँडिंग
आजअजिंठा वेरूळ हेच एमटीडीसीचे ब्रँडिंगचे प्रमुख पर्यटनस्थळ मानले जाते. त्यातही जपानी आशियाई देशांतील पर्यटक युरोप - अमेरिकेतील पर्यटक आैरंगाबादला येत असतात. डनहुआंग औरंगाबाद यांच्यातील बुद्ध लेण्यांतील साम्याचा पर्यटनवाढीत फायदा करून घेण्यासाठी एमटीडीसी चीनमध्ये अजिंठाकेंद्रित महाराष्ट्राचे ब्रँडिंग करण्याच्या विचारात आहे. मेमध्ये चीनच्या सीसीटीव्ही चॅनलवर अजिंठ्याच्या लेणीबाबत दहा मिनिटांची एक फिल्म प्रसारित करण्यात आली. पर्यटकांकडून विचारणा वाढल्याने एमटीडीसी विचार करत आहे.

जपान आणि थायलंड या बुद्धिस्ट राष्ट्रांत पर्यटन करणाऱ्या मध्यमवर्गीय चिनी पर्यटकांची संख्या अधिक दिसून आली. एकट्या जपानमध्ये गतवर्षी फक्त जुलै महिन्यात पावणेसहा लाख चिनी पर्यटक येऊन गेले, तर गेल्या सात महिन्यांतच थायलंडमध्ये ४७ लाख चिनी पर्यटक येऊन गेले. वर्षभरात थायलंडच्या अर्थव्यवस्थेत चिनी पर्यटकांमुळे पावणेदहा अब्ज डाॅलर्सची भर पडणार आहे.
बातम्या आणखी आहेत...