आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Year 57 Goods Date For Marriage, Latest News In Marathi

यंदा लग्नाच्या गाठीसाठी ५७ तिथी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्यांचा यंदा शुभ मंगलाचा योग आहे त्यांचं लक्ष तुलसी विवाहाकडे लागलेले असते. तुलसी विवाह आटोपताच लग्नाचे मुहूर्त पाहून थाटामाटात लग्न सोहळा पार पाडला जातो. तुलसी विवाहही नुकताच पार पडल्याने लगनीघाई सुरू झाली. मात्र, यंदा कार्तिक महिन्यात शुक्रास्त असल्याने एक महिना उशिराने शुभ मुहूर्त सुरू होणार आहेत. लग्नविधीसाठी या सराईत ५७ तिथी शुभ मानल्या जात आहेत.
यंदा कर्तव्य आहे, असे सांगतानाच त्यासाठी वर्ष-सहा महिन्यांपासूनच तयारी करण्यात येते. यंदा ही तयारी पूर्ण झाली असली तरी वधू-वरांना एक महिना वेटिंगवर राहावे लागणार आहे. सध्या कार्तिक महिन्यात शुक्रास्त असल्यामुळे लग्न तिथीचे मुहूर्त नाहीत. लग्न पार पडण्यासाठी गुरुबल, चंद्रबल, रवीबळ सोबतच शुक्रबल महत्त्वाचे असते. कार्तिक महिन्यात शुक्र अस्तामध्ये आहे म्हणजेच त्या ग्रहाचा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे एक महिना कोणत्याही प्रकारचे लग्नकार्य, मुंज, वास्तुशांती, नवग्रहशांती करता येत नाही. याचा परिणाम लग्न तिथीवरही झाल्याने वधू-वरांना इच्छा असूनही एक महिना थांबावे लागणारच आहे.

यंदाच्या लग्न मुहूर्तात ५७ तिथी
कार्तिक महिन्यातील शुक्रास्त व संपूर्ण पौष गुढीपाडव्यातील चैत्र महिन्यात विवाह मुहूर्त नसल्याने जून (२०१५) महिन्याच्या १२ तारखेपर्यंत ५७ तिथी आहेत. यात मार्गशीर्ष महिन्यात २६ , २८ तसेच १ , ३, ६, १२, १५, १६, १७ आणि १८ नोव्हेंबर. पौष महिना सोडून माघ महिन्यात २४, २५ , २६, २९ जानेवारी ७ ते १३ फेब्रुवारी आणि १५ फेब्रुवारी, याबरोबरच फाल्गुन महिन्यात २१, २२, २३, २६, २७ फेब्रुवारीला शुभ तिथी आहेत. मार्च महिन्यात ४, ७, ९, १०, १२, १७ या तारखांना शुभ मुहूर्त आहेत. गुढीपाडव्यानंतर चैत्रात मुहूर्त नसल्यामुळे वैशाख महिन्यातील २१, २७, २८, ३० एप्रिल तर मे महिन्यात २, ५, ६ , ७, ८, ९, ११, १४, १५ मे, ज्येष्ठ महिन्यात २७, २८ , ३० मे, २, ४, ६, ७, ११ आणि १२ जून या तिथी विवाह तसेच साखरपुडा करण्यासाठी शुभ दिवस आहेत.

मंगल कार्यालये बुक
वर्षभरात पार पडणाऱ्या शुभ तिथींमध्ये रविवार प्रथम पाहिला जातो. यंदा कर्तव्य आहे असे समजून तयारीला लागलेल्या वधू-वर पिते रविवार विशेष दिवस ठरवत आहेत. लग्न तिथीत ७ डिसेंबर, २५ जानेवारी, ८ फेब्रवारी, १५ फेब्रुवारी, २२ फेब्रुवारीला रविवार असल्याने मंगल कार्यालयांची आतापासूनच बुकिंग केली जात आहे.

लग्नासाठी शुभ दिवस
यावर्षी कार्तिक महिन्यात शुक्रास्त असल्यामुळे कोणतेही शुभ कार्य होऊ शकत नाही, परंतु यंदा लग्न सोहळ्यांसाठी चांगले शुभ दिवस आहेत.
दिनकर मधुकर जोशी, ज्योतिषाचार्य