आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Young Charlie For The Safety Of The City, Commissioner Amitesh Kumar's Idea

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहराच्या सुरक्षेसाठी आता यंग चार्ली, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची कल्पना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादकरांच्या सुरक्षेसाठी आता १५२ नव्या चार्ली कमांडोंची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली बीट मार्शल ही पद्धत बंद करून चार्ली ही संकल्पना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नव्याने सुरू केली आहे. सोमवारी संध्याकाळपासून या चार्लींकडे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली.
रस्त्यांवर वाढणारे गुन्हे, विशेषत: मंगळसूत्र चोरी, तोतया पोलिसांकडून होणारी फसवणूक, जबरी चोरी आदी प्रकार थांबवण्यासाठी विशेष कमांडो प्रशिक्षण घेतलेल्या या चार्लींची नियुक्ती करण्यात आली. अपघातानंतर जखमींना मदत करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास काय करावे याचे प्रशिक्षण या कमांडोंना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पथकाचे नियंत्रण थेट पोलिस आयुक्त करणार आहेत. पहिल्या दिवशी शहराच्या विविध भागांत रॅली काढून या पथकाची औरंगाबादकरांना ओळख करून देण्यात आली.
काबंद केली जुनी पद्धत : यापूर्वीबीट मार्शल पद्धत होती. संबंधित पोलिस ठाण्याच्या नियंत्रणाखाली बीट मार्शल काम करत होते. मात्र, अनेक ठिकाणी त्यांचे लागेबांधे असल्याचे समोर आले. याशिवाय या पथकात अनेक ज्येष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे उत्साहाची कमतरता जाणवत होती. म्हणून बीट मार्शल बंद करून चार्ली ही नवीन पद्धत सुरू करण्यात आली.
सुरक्षेसाठी बोलवायचे असल्यास : आपल्याभागातील घडणारी घटना या चार्लीपर्यंत पोहोचवायची असल्यास १०० नंबर किंवा पोलिस आयुक्तालयाच्या ०२४०- २२४०५०० या क्रमांकावर संपर्क साधून आपली अडचण सांगू शकता. अवघ्या पाच मिनिटांच्या आत चार्ली घटनास्थळी पोहोचतील.
चार्लींची वैशिष्ट्ये
शहराच्या गस्तीसाठी निवडलेले १५२ तरुण पोलिस कर्मचाऱ्यांनी कमांडो ट्रेनिंग घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छेने ही नियुक्ती झाली आहे. स्ट्रीट क्राइमला थांबवण्याचे विशेष प्रशिक्षण या पथकाला दिले आहे. गस्तीसाठी ३८ दुचाकी देण्यात आल्या आहेत. एका गाडीवर दोन कर्मचारी, त्यांना इतर पोलिस कर्मचाऱ्यांपेक्षा विशेष गणवेशही देण्यात येणार आहेत. सकाळी साडेनऊ ते दीडपर्यंत कर्मचारी गस्त घालतील. चार वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने आराम करून चार ते नऊ पुन्हा गस्तीसाठी तयार राहतील. पुन्हा १२ ते पहाटे पाचपर्यंत हे पथक शहराची सुरक्षा करेल. विशेष म्हणजे यांच्याकडे सुरक्षेसाठी शस्त्रेदेखील देण्यात आली आहेत.