आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राका’चा करार रद्दच्या हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बेकायदाबांधकाम, मसाज पार्लर, सीसीटीव्ही, बेकायदा नळ कनेक्शन यामुळे वादग्रस्त ठरलेल्या राका लाइफस्टाइलच्या बाबतीत प्रचंड ओरड झाल्याता कुठे कारवाईच्या हालचाली करत असून करार रद्द करण्याबाबत ‘राका’नंतर मनपा आला नोटीस दिली जाणार आहे. ही नोटीस तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून एक ते दोन दिवसांत ही नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे
. दुसरीकडे सुनील राका यांनी आपली बाजू मांडत अनधिकृत बांधकाम आपण सूचना मिळताच काढून टाकल्याचे सांगतानाच सील ठोकण्याची कारवाई बेकायदा असल्याचा दावा केला आहे.
राका लाइफस्टाइलचे प्रकरण एवढे गाजत असताना महापालिकेने मुंगीच्या गतीने कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याने नानाविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिक, लोकप्रतिनिधी माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर मनपाने कारवाईचा निर्णय घेतला आहे.
कायदेशीर बाबी तपासून आता राका लाइफस्टाइलला करार रद्द करण्याची नोटीस देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यात अनधिकृत बांधकामे, सीसीटीव्हीचा गैरवापर, स्विमिंगपूलच्या काचा मसाज पार्लर यांचा आधार घेण्यात येणार आहे. येत्या एक-दाेन दिवसांत ही नोटीस बजावली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

राकांचा खुलासा
मागीलदहा दिवसांपासून गाजत असलेल्या या प्रकरणावर आज सुनील राका यांनी आपली बाजू मांडण्यासाठी दोन पानी निवेदन प्रसिद्धीला दिले. त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे असे...
{मनपाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देताच अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली होती, शेडही काढून टाकले. पण दुसऱ्याच दिवशी कोणतीही नोटीस देता प्रकल्पाला बेकायदा सील लावले.

{मनपाने मंजूर केलेल्या नकाशावरच पार्लर मसाजला परवानगी दिली आहे. त्यात आक्षेपार्ह काही नाही. हेअरकटिंगच्या भागातच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ते सुरक्षेसाठी आहेत.

{महिलांसाठी असलेल्या वेळेत पुरुषांना स्विमिंगची परवानगीच नाही. कोच, लाइफ गार्ड पुरुष आहेत; पण त्यात आक्षेपार्ह काही नाही. पारदर्शक काचा खिडकी स्विमिंगच्या आजूबाजूला असतील तर त्यात आक्षेपार्ह काय आहे?

{आम्ही हाॅटेल चालवायला दिले होते. त्यांनी हुक्का पार्लर सुरू केले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर ते बंद करण्यात आले नंतर शेडही काढून टाकण्यात आले.
राकांचा मनपात फेरफटका
दरम्यान,स्पोर्ट्स क्लबचे प्रकरण जास्तच पेटल्यानंतर खासकरून सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क गायब झाल्यानंतर आज प्रथमच सुनील राका त्यांच्या सहकाऱ्यांनी मनपात पाय ठेवला. पदाधिकाऱ्यांना भेटायला आलेल्या राका यांना कोणीच पदाधिकारी उपस्थित नसल्याने अधिकाऱ्यांना भेटून परतावे लागले. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रफुल्ल मालाणी त्यांच्यासोबत होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
कारवाईचा बडगा