आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NSS 10 Marks Use For Admission Issue At Aurangabad

राष्‍ट्रीय सेवा योजनेचे दहा गुण प्रवेशासाठी करणार मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यापुढे पदव्युत्तरसाठी प्रवेश घेताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे या गुणांची मदत येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सर्व विद्या शाखांमधील ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग नोंदवला असेल, त्यांना अतिरिक्त दहा गुण मिळणार आहेत. हा लाभ येत्या शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून मिळेल. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश देताना त्यांना प्राप्त केलेल्या एकूण गुणांमध्ये हे अतिरिक्त १० गुणांचा समावेश करण्यात यावा, असा आदेश यूजीसीने दिला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना तर होईलच शिवाय राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश हा सामाजिक विषयांची जाणीव आणि कर्तव्यदक्ष विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी होणार आहे.