आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फेसबुक\'वर बदनामीची धमकी; औरंगाबादेत पोलिसाच्या मुलीवर अत्याचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिप फेसबुकवर टाकून बदनामी करण्याची धमकी देत दीड महिना 13 वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्‍या ट्रॅव्हल्स एजन्सीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बालिका एका महिला पोलिस कर्मचार्‍याची मुलगी असल्याचे समजते.

अत्याचार करणार्‍या शेखच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी दिली. इनोव्हा कारचा चालक शेख (40) मुकुंदवाडी परिसरातील म्हाडा कॉलनीत राहणार्‍या बालिकेला नियमितपणे शाळेत ने-आण करायचा. अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिप फेसबुकवर टाकून बदनामी करतो, अशी धमकी शेख बालिकेला द्यायचा. या धमकीमुळे बालिका भेदरली होती. ती घाबरल्याची संधी साधून शेखने दीड महिन्यात तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. सोमवारी (8 जुलै) या बालिकेने घडलेली हकीकत तिच्या कुटुंबीयांना सांगितली. यानंतर महिला पोलिसाने ठाणे गाठत चालकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.