आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनका "नंबर' कब आयेगा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विचित्र नंबरप्लेट असलेल्या वाहनांवरील कारवाईसाठी नागरिकांकडून व्हॉट्स अॅप, फेसबुकवर फोटो पाठवण्याचे आवाहन पोलिसांनी केले. सुजाण युवकांनी जोरदार पाठिंबा दिला. मात्र, शहरात असंख्य विचित्र नंबरप्लेट अजूनही दिसत आहेत. दुसरीकडे रस्त्यावर टोळीने उभे राहणारे पोलिस याकडे उदासीनतेने बघत असल्याने नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे पोलिस कारवाईचा दावा करत असले तरी फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांचा सुळसुळाट कायम आहे.
वाहतूक नियमांना बगल देणाऱ्या फॅन्सी व विचित्र नंबरप्लेट लावून फिरणाऱ्या वाहनधारकांविरोधात सुरू झालेल्या अभियानाला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पोलिस अशा लोकांना नोटीस पाठवत आहेत. मात्र, त्यांची संख्या पाहता ही कारवाई वर्षानुवर्षे सुरू राहू शकते. व्हॉट्स अॅपवरून गेल्या तीन महिन्यांमध्ये पोलिसांनी ६१ फॅन्सी नंबरची नोंद घेतली आहे. यापैकी ४१ जणांवर कारवाई केली आहे, तर २० जणांना नोटीस बजावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मोठ्या कारवाईची गरज
"फॅन्सी' वाहनधारकांना चाप बसवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शहरभर एकाच वेळी मोठी कारवाई होणे अपेक्षित आहे. वाहतूक पोलिसांनी व्हॉट्स अॅप अभियानाबरोबरच विशेष मोहीम चालवून कारवाईमध्ये सातत्य ठेवणे आणि पोलिस कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
काय आहे हे अभियान
चेनस्नॅचिंग, लुबाडणूक, वाहनांची चोरी आदी अपराधांना आळा बसावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी व्हॉट्स अॅपचा हेल्पलाइनसारखा वापर केला. आता विचित्र व फॅन्सी नंबरप्लेट विरोधातही हे अभियान सुरू करण्यात आले होते. त्यानुसार ९६०४४३६७८९ या नंबरवर विचित्र नंबर प्लेटचे फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फॅन्सी नंबरप्लेटचे व्हॉट्स अॅपवर किती फोटो प्राप्त झालेत?
नागरिकांचा या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यानूसार कारवाईही चालू आहे.

आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली?
व्हॉट्स अॅपवर प्राप्त झालेल्या फोटोवरून ६० पेक्षा जास्त जणांची नोंद घेऊन नोटीस बजावल्या आहेत. िशवाय आठ जणांना समन्स बजावले आहे.

ही कारवाई कमी असल्याचे वाटत नाही का?
प्राप्त झालेल्या फोटोंपैकी दखलपात्र असलेल्या सर्वांवर आम्ही कारवाई केली आहे. मात्र, काही वाहने शहराबाहेरील, परजिल्ह्यातील असल्याने काही मर्यादा येतात. याशविाय या महिन्यात ३५०, तर चालू वर्षी ४ हजार शंभर फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे हे अभियान
चेनस्नॅचिंग, लुबाडणूक, वाहनांची चोरी आदी अपराधांना आळा बसावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी व्हॉट्स अॅपचा हेल्पलाइनसारखा वापर केला. आता विचित्र व फॅन्सी नंबरप्लेट विरोधातही हे अभियान सुरू करण्यात आले होते. त्यानुसार ९६०४४३६७८९ या नंबरवर विचित्र नंबर प्लेटचे फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंबर दवि्यालाही फॅन्सीची भुरळ
अंबर दविा लावून मिरवणाऱ्या अिधकाऱ्यालाही फॅन्सी नंबरची भुरळ पडलेली दिसते. पैठण येथील बाबूराव शिंदे यांच्या नावे असलेले होंडा सिटी हे वाहन गाडीवरील अंबर दवि्यावरून उच्चपदस्थ अिधकाऱ्याकडे असल्याचे दिसते. वाहनाचा एमएच २०, डीसी २०२० हा क्रमांक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेला आहे. हे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांसमोर कोणता आदर्श ठेवत आहे, असा प्रश्न पडतो.
..तर मोठी कारवाई
दररोज वाहतूक नियम तोडणाऱ्यांकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला जातो. पोलिसांनी काम केले नसते तर हे शक्य नसते. गरज वाटल्यास अभियान राबवू. लोकांनी विश्वास ठेवावा.
- राजेंद्र सिंह, पोलिस आयुक्त

बदल दिसावा ही अपेक्षा

आम्ही त्रास, बोलणी सहन करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या गाड्यांचे फोटो पाठवत आहोत. मात्र, पुन्हा अशाच गाड्या दिसल्या तर फसवल्यासारखे वाटते. तरीही मी आपले कर्तव्य पार पाडणार, पोलिसांनी काय करायचे ते ठरवावे.
- ज्योती शर्मा, जागरूक नागरिक

चार ते पाच पोलिसांचे फोटो पाठवले

पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर चुकीचे नंबर टाकलेले असल्याने दवि्याखालीच अंधार, असा प्रकार आहे. मी चार ते पाच पोलिसांचे फोटो पाठवलेत. काम करणाऱ्या पोलिसांमध्ये निराशा आहे. हे चित्र बदलायला हवे.
- रवी चौधरी, जागरूक नागरिक