आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाऊ-दादा-नानांना दणका; पाच वाहनधारकांना ठाण्यात बोलावून कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाहतूक पोलिसांची दादा-भाऊ-नानांवर कारवाई सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत सुमारे 130 दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करीत 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला. शिवाय डीबी स्टारने वाहतूक पोलिसांना दिलेल्या यादीतील आणखी 5 वाहनधारकांना ठाण्यात बोलावण्यात आले. त्यांच्या वाहनांवरील विचित्र नंबरप्लेट काढून घेत त्यांच्याकडून दंडही वसूल केला. डीबी स्टारने याबाबत ‘पोलिसांची नंबरी कारवाई’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
वाहनांवर चित्रविचित्र नंबरप्लेट लावून फिरणार्‍या भाऊ, दादा, नाना आणि सरांना ठाण्यात बोलवा. या कथित नेत्यांवर कडक कारवाई करा, असे स्पष्ट आदेश वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजित बोर्‍हाडे यांनी दिले होते. नियम डावलणार्‍या वाहनांबाबत 9604436789 या मोबाइलवर व्हॉट्स अ‍ॅपवर माहिती पाठवा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले होते. हे आहेत बहाद्दर रावसाहेब आमले (एमएच 20 पीक्यू 2197), प्रताप पवार (एमएच डीबी- 4972), अशोक सोळंके (एमएच 20 सीएच 2151), सुधाकर धांते (एमएच 20 डीक्यू 4135), रिचा कपिल जैस्वाल (एमएच 20 जीएच 347) या पाच वाहनधारकांना ठाण्यात बोलावून कारवाई केली.
कारवाईत सातत्य राहील
ही कारवाई आम्ही तात्पुरती नव्हे, तर सातत्याने करणार आहोत. जे वाहनधारक नियमबाह्य नंबरप्लेट लावतील, तसेच वाहतुकीच्या नियमांचा भंग करतील त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल.
-अजित बोर्‍हाडे, सहायक आयुक्त, वाहतूक शाखा