आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेणी डोळ्यात साठवून ‘तिने’ जग सोडले; परदेशातील नुरलची शेवटची इच्छा पुर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिंगापूर येथील नुरुल आश्कीन बेग इस्माईल (३५) या महिलेलाही अजिंठा लेणी पाहण्याची अतीव इच्छा होती. मात्र दोन्ही किडन्या निकामी होत आल्याने ती अंथरुणाला खिळून होती. तरीही तिने सतीशकुमार चंद्र या मित्राकडे अजिंठा लेणी पहाण्याचा हट्ट धरला. त्यानेही तो पूर्ण केला आणि लेण्यातील चित्रशिल्पे डोळ्यात साठवून शुक्रवारी पहाटे तिने औरंगाबादेतील एका खासगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 

२१ मे रोजी ती भारतात आली होती. अजिंठा येथे लेण्या पाहून आल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला सतीशकुमार यांनी उपचारासाठी सिडको एन-२ येथील एका खासगी दवाखान्यात २५ मे रोजी सायंकाळी ६.०८ मिनिटांनी दाखल केले. डॉ. राहुल शिरपेवार यांनी तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, त्याचा उपयोग होऊ शकला नाही. 
बातम्या आणखी आहेत...