आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नर्सचा विनयभंग; तिघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रुग्णाला पाहण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनी परिचारिकेला अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी (16 फेब्रुवारी) सायंकाळी एमजीएम रुग्णालयात हा प्रकार घडला.

अशरफ खान गफूर खान (22) इमरान खान अख्तरखान (20) आणि सय्यद मुजीब सय्यद सन्नोद्दीन (23) हे तिघे शनिवारी सायंकाळी त्यांच्या नातेवाइकाला भेटण्यासाठी एमजीएम रुग्णालयात गेले होते. या वेळी वॉर्डमध्ये आलेल्या अशरफने या परिचारिकेला पाहून हातवारे करण्यास सुरुवात केली. तिने ही बाब तातडीने सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आणून देत त्यांची तक्रार केली. सुरक्षा रक्षकाने या तिघांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी उलट दादागिरी केली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने सिडको पोलिसांना कळवले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. परिचारिकेच्या तक्रारीवरून तिघांच्या विरोधात अश्लील हातवारे केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या 509 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली.