आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नर्सिंगचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. रत्नमाला भिकू दातार (18, रा. अरिहंतनगर) असे तिचे नाव आहे. तिच्याजवळ सापडलेल्या सुसाइड नोटवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मूळची बीड जिल्ह्यातील बेलगाव येथील रत्नमाला मोठी बहीण सुलभा आणि दोन मैत्रिणींसह अरिहंतनगरातील राजेंद्र इनामके यांच्या घरात एक महिन्यापूर्वी राहायला आली होती. सेव्हन हिल्स परिसरातील शिवा ट्रस्ट नर्सिंग कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत होती, तर तिची बहीण एका खासगी कार्यालयात नोकरीस आहे. रविवारी दुपारी रत्नमाला एकटीच घरी होती. तिने नायलॉनची दोरी छताच्या अँगलला अडकवून गळफास घेतला. घरी परतलेल्या बहीण सुलभाने घराचा समोरील दरवाजा वाजवला. मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने तिने दरवाजावरील खिडकीतून आत डोकावले.

तेव्हा रत्नमालाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिने घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मृतदेह बाहेर काढला. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आला.