औरंगाबाद - नायलॉन मांजामुळे बुधवारी दुपारी एका व्यक्तीचा गळा चिरून गंभीर दुखापत झाली. श्रीराम काशीराम रामावत असे जखमी व्यक्तीचे नाव अाहे. या घटनेमुळे शहरात चिनी मांजाचा (नायलॉन) वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जाधववाडीत राहणारे श्रीराम रामावत बुधवारी दुपारी टीव्ही सेंटरहून सेव्हन हिल्सकडे दुचाकीवर येत असताना एम-२, पवननगर रोडवर चार मुले रस्त्यावर पतंग उडवत होती. दरम्यान, अचानक त्यांच्या मानेला मांजा अडकला. लगेच त्यांनी मांजा पकडल्याने त्यांच्या मानेला कमी दुखापत झाली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी चिनी मांजावर बंदी घातल्याच्या निर्णयाचे श्रीराम यांनी स्वागत केले. मात्र, बंदी असूनही चायनीज मांजाचा सर्रास वापर होत असल्याबद्दल त्यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना खंतही व्यक्त केली. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन चायनीज मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. जखमीवर उपचार करण्यात आले आहे.
पुढे वाचा... पत्नीच्या विरहात मजुराची आत्महत्या