आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ ओबीसी, मुस्लिमांची एकजूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठाक्रांती मोर्चानंतर आता अॅट्रॉसिटी अॅक्टच्या समर्थनार्थ एससी, एसटीसह ओबीसी आणि मुस्लिम समाजबांधवदेखील एकवटले आहेत. नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या बहुजन क्रांती मूकमोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी परवानगी दिली तर वातावरण निर्मितीसाठी नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता ‘टू व्हीलर’ रॅली काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुके आणि शहरातून अंदाजे दहा लाख लोकांना एकत्रित आणण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या मोर्चात अॅट्रॉसिटी अॅक्टचे संरक्षण असलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीतील सर्वच जाती सहभागी होतील, असे नियोजन सुरू आहे. लाखांपेक्षा अधिक महिला, लाख युवक आणि युवती आणि ग्रामीण भागातून प्रत्येक संघटनांच्या कार्यकर्त्यांसह १० लाखांची उत्स्फूर्तपणे एकजूट दिसणार आहे. मोर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी शहरात चार ठिकाणी वाहनतळ करण्यात येणार आहे. जालना रोडकडून येणाऱ्या वाहनांना शासकीय दूध डेअरीची जागा उपलब्ध झाली आहे. वाळूज, गंगापूर, वैजापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी कर्णपुरा येथील मैदानावर पार्किंग केली आहे. त्याशिवाय मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंग आहे. आमखास मैदानावर मोर्चाचे विसर्जन होईल. येथे १६०० चौरस फुटांचा मंच उभारण्यात येणार असून मराठा, बौद्ध, चर्मकार, मातंग, मुस्लिम आणि ओबीसी समाजातील प्रत्येकी एका युवतीचे प्रातिनिधिक भाषण होणार आहेत. मोर्चा विशिष्ट एका जातीचा नसून जातीअंताच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण पाऊल ठरावे, हाच संदेश देण्याचा मोर्चेकऱ्यांचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. मोर्चाच्या अग्रभागी अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे बौद्ध भिक्खू राहतील. त्यानंतर युवती-महिला, पुरुष-युवक आणि शेवटी पुढारी राहणार आहेत.

दुचाकी रॅली काढण्याचा प्रयत्न : जिल्ह्यात आतापर्यंत पाच ते सहा हजार बैठका घेण्यात आलेल्या आहेत. मोर्चा भव्य निघावा म्हणून शहरातून नोव्हेंबरला दुचाकी रॅली काढण्याची युवकांनी तयारी केली आहे. सुमारे १५ ते २५ हजार वाहनांची रॅली शहरातील सर्व नागरी वसाहतींमध्ये जाण्याचे नियोजन आहे. पोलिस आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. परवानगी मिळाल्यास क्रांती चौकातून दुपारी वाजता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आयुक्तांनी दिले एक लाखाचे म्युरल्स भेट
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी २७ ऑक्टोबरला मोर्चेकऱ्यांची व्यापक बैठक घेतली होती. आता पुन्हा नोव्हेंबरला बैठक होईल. वाहनतळांची व्यवस्था, स्वयंसेवींची संख्या, विसर्जनस्थळ आदींचा ते सतत आढावा घेत आहेत. आयुक्तालयातील २७ ऑक्टोबरच्या बैठकीत अमितेशकुमार यांनी बुद्ध लेणी येथील बौद्ध भिक्खू संघाला एक लाख रुपये किमतीच्या दोन वस्तू भेट दिल्या आहेत. बौद्ध प्रतिमांचे म्युरल्स आणि लेणीवरील बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी जिना दिल्याची माहिती प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्राचे अध्यक्ष भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...