आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पचपन... आणि बचपन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज बालदिन. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. बरोबर 55 वर्षांपूर्वी 14 नोव्हेंबर 1958 रोजी पंडितजी औरंगाबादेत आले तेव्हा हॉटेल ‘औरंगाबाद अशोक’मध्ये त्यांचे वास्तव्य होते. शहरातील शिशुविकास प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना तेथे त्यांची भेट घेण्याची संधी मिळाली. तेव्हा पाच वर्षांचे असलेले सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बसैये यांना पंडितजींना पुष्पहार घालण्याचा मान मिळाला. प्रभात फोटो स्टुडिओने टिपलेला तो क्षण छायाचित्ररूपाने बसैये यांच्या संग्रहात आहे. त्यांनी ते ‘दिव्य मराठी’स उपलब्ध करून दिले. त्यात बसैये पंडितजींशी हस्तांदोलन करताना. सोबत तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिशुविकास शाळेच्या शिक्षिका लीलाताई साडेकर आणि लहान मुलगी उज्ज्वला काबरा.