आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसापला राजकारणाचा अड्डा होऊ देणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आम्हाला मसाप हा राजकारणाचा अड्डा करायचा नाही. दुर्लक्षित साहित्यिकांना प्रवाहात आणून त्यांना न्याय द्यायचा आहे. स्वतंत्र विचाराने साहित्य क्षेत्राला पुढे जाण्यासाठीच आमची विकास आघाडी आहे, असे प्रा. मोहन सौंदर्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मसाप विकास आघाडीच्या वतीने निवडणुकीनिमित्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. सौंदर्य म्हणाले, आम्ही सर्व अपक्ष उमेदवार मराठवाडा साहित्य परिषद विकास आघाडी घेऊन मसापमधील मक्तेदारी आणि राजकारणमुक्त मसाप असावे यासाठी आमची भूमिका सर्वांसमोर ठेवणार आहोत. वंचितांना साथ देऊन मसापचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे जाहीर करतानाच मधुकरअण्णा मुळे जिथे तिथे चव्हाण आणि मुळे जिथे जिथे आहेत तिथे ते चव्हाणांना नको आहेत. म्हणून अप्रत्यक्षपणे अनेक राजकीय खेळ या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत,असेही ते म्हणाले. मसापने कधीच दलित साहित्य संमेलन घेतले नाही. आम्ही निवडून आल्यावर नि:पक्ष भूमिका मांडू, असा दावाही प्रा.सौंदर्य यांनी केला. डॉ. विलास गाजरे म्हणाले, मोठे ग्रंथालय व्हावे, एक दिवस मराठीसाठी म्हणून एक अभियान इंग्रजी शाळांमध्येही राबविण्यात येईल. तालुकास्तरावर साहित्य परिषदेच्या शाखेसाठी प्रयत्न करू.
अपक्ष उमेदवार : अनंत काळे, प्रा. विनय हातोले, डॉ.विलास गाजरे, प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे, बबन पुंडलिक मोरे, के.व्ही.सरवदे
असे आहेत जाहीरनाम्यातील मुद्दे
- आजीवसदस्य फी ३००० हून १००० करणार
- अभ्यासकांसाठी भव्य ग्रंथालय सुरू करणार
- आजीव सभासदांना माफक दरात साहित्यिक कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून देणार
- नवोदित लेखकांच्या दर्जेदार साहित्यास प्रसिद्धी देणार
- वाङ्मय पुरस्काराची व्याप्ती वाढवू.
- संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण करणार
बातम्या आणखी आहेत...