आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय अधिकारी एक दिवस मजुरांसोबत उपक्रमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - एकदिवस मजुरांसोबत उपक्रम ३० एप्रिलला राबवण्यात येणार असून जिल्हा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी मजुरांसोबत राहून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. उपक्रमासाठी जिल्ह्यातील अठरा गावांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी एक दिवस मजुरांसोबत ही संकल्पना वर्षातून दोनदा ३० एप्रिल आॅक्टोबर ग्राम रोजगारदिनी राबवण्यात येणार आहे. नियुक्त करण्यात आलेले महसूल जिल्हा परिषदेचे जिल्हा तालुकास्तरीय अधिकारी एक दिवस मजुरांसोबत राहणार आहेत. ३० एप्रिल २०१५ रोजी उपक्रमाची सुरुवात संपूर्ण राज्यात करण्यात येणार असून जिल्हास्तरावरून जिल्हास्तरीय संपर्क तालुकास्तरीय कार्यक्रम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नऊ तालुक्यांमधील अठरा गावांची निवड करण्यात आली आहे.

एक दिवस मजुरांसोबत उपक्रमाची संकल्पना: महसूल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विस्तारित समाधान योजनेंतर्गत नोंदणीकृत मजुरांना वैयक्तिक विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मजुरांना देण्यात येणार आहे. नोंदणीकृत मजुरांची बैठक घेऊन आवश्यक योजनांची माहिती देऊन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.
नवीन पात्र मजुरांची नोंदणी करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये मग्रारोहयोची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेली आहेत.

मोठ्या प्रमाणात मजूर उपस्थिती आहे तसेच ज्या गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेली असतील अशा गावांची निवड करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. दिलेला लाभ, संबंधित विभागाचे नाव, लाभार्थींची संख्या कार्यवाहीचा अहवाल पंधरा दिवसांत शासनास कळवणे बंधनकारक असणार आहे.

^बुधवार दि.२९ रोजी संध्याकाळपर्यंत पळशी केऱ्हाळा येथील मजुरांना लाभ देण्यासाठी माहिती मागवण्यात आली आहे. त्यांना द्यावयाच्या लाभाशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून ३० एप्रिलला लाभ देण्यात येईल. शासनाने कळवलेल्या लाभाच्या योजनांसह शिधापत्रिकांचेही वाटप करण्यात येणार आहे. राहुलगायकवाड, तहसीलदार

जनजागृती योजना
कृषी,वृक्ष लागवड संगोपन, फलोत्पादन, जैविक, सेंद्रिय खत निर्मितीविषयक सल्ला मार्गदर्शन. पशू आरोग्य देखभालीसंदर्भात मार्गदर्शन. महिला बाल आरोग्यविषयक सल्ला, वैयक्तिक परिसर स्वच्छता, जल, मृद परीक्षण, जलसंधारणांच्या कामांविषयी मार्गदर्शन करणार आहे.

तालुक्यांमधून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायती
सिल्लोड(पळशी,केऱ्हाळा),औरंगाबाद (खोडेगाव,ओहर),गंगापूर (वजनापूर,गाजगाव),कन्नड(वासडी,दिगाव),खुलताबाद (कनकशिळ,गोळेगाव),पैठण(कोळी बोडखा,पाचोड बुद्रुक),फुलंब्री (गणोरी,डोंगरगाव कवाड),सोयगाव (गलवाडा,कंकराळा), वैजापूर(पालखेड, परसोडा).

लाभांच्या योजनांचा लाभ
कामगारकल्याण मंडळाच्या माध्यमातून अनुज्ञेय लाभार्थी तसेच, इतर लाभार्थी यांना राज्य कामगार विमा योजना आम आदमी विमा योजनेचा लाभ. नेत्रतपासणी करून चष्म्यांचे वाटप, मधुमेह, अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन हेल्थ कार्ड देणे. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे. जातीचे, वयाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सातबारे उतारे इत्यादी दाखले देणे.