आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बीच्या विक्रमी पेऱ्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उत्तम पर्जन्यमानामुळे तीन ते चार वर्षांनी मराठवाड्यात रब्बीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यात अधिकाधिक उत्पादन देणारी पिके शेतकऱ्यांना घेता यावीत, विक्रमी पेरा व्हावा यासाठी कृषिशास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी गावात आाणि प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरल्लू यांनी केले.

रब्बीच्या पेरणीबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सोमवारी विभागीय कृषी संशोधन विस्तार सल्लागार समितीची ६० वी बैठक कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरल्लू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी संशोधन विभागाच्या सभागृहात झाली. तीत ते बोलत होते. बैठकीला संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, लातूर विभागाचे अशोक किरनाळी, आठही जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषिशास्त्रज्ञ आणि आत्मा प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. व्यंकटेश्वरल्लू म्हणाले की, परतीच्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले. काही महत्त्वाच्या जलसाठ्यात ८० ते १०० टक्के पाण्याचा साठा झाला आहे. याचा शेतीसाठी उपयोग करून घेण्यासाठी आतापासूनच नियोजन करा.

११ टक्के क्षेत्र वाढणार
लातूर,उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांचे सरासरी क्षेत्र १२१४१.५४ हेक्टर असून यंदा १३ लाख ४८ हजार ६०० हेक्टर प्रस्तावित आहे. ११ टक्के क्षेत्र यावर्षी वाढणार आहे. तृणधान्य १४ टक्के, अन्नधान्य ३० टक्के, गळीत धान्य लागवडीच्या क्षेत्रात २१ टक्के वाढ केली जाणार असल्याचे विभागीय कृषी संचालक किरनाळी यांनी सांगितले.

मराठवाड्यातील रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र असे
औरंगाबाद,जालना बीड जिल्ह्यांचे एकूण सरासरी क्षेत्र लाख हेक्टर असून ८.९९ लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जे गतवर्षीपेक्षा १.९९ लाख हेक्टरनी जास्त आहे. २४ सप्टेंबरपर्यंत ५५२.२६ मिमी म्हणजे ९४.७६ मिमी पाऊस पडला. पाण्याची उपलब्धता, जमिनीचा दर्जा लक्षात घेऊन हरभरा चार पट्टीने, करडई २० टक्के, रब्बी ज्वारी १७.२७ टक्के आणि गव्हाच्या क्षेत्रातही ७६.५६ टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी असे करावे नियोजन
सर्वांनीएक पीक पद्धती टाळून बहुपीक पद्धतीचा वापर करावा. शेतमालाच्या किमतीवर बाजाराचा अंदाज बांधता येत नाही, हे लक्षात घ्यावे. ऑक्टोबर हिट, वादळी पाऊस, पाण्याची उपलब्धता, थंडीचा कडाका या वातावरणातील बदलाचे भान ठेवावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जमिनीच्या पोतनुसार पिकांचे नियोजन करावे. ठिबक सिंचन, तुषार, स्पिंकलर आदींचा वापर करून गरजुनेसार पाण्याचा वापर करावा, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ कृषी अधिकाऱ्यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...