आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरावर ढगांचे आच्छादन, हलका पाऊस; ओखी चक्रीवादळाचा परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ओखी चक्रीवादळ मुंबई, रत्नागिरीपर्यंत येऊन धडकल्यामुळे हवामानात वेगाने बदल झाले असून मंगळवारी औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रावर दाट ढगांची चादर पसरली होती. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही झाला. थंड वाऱ्याच्या लाटेमुळे कमाल तापमानाने यंदा प्रथमच २५.२ अंशांवर नीचांकी पातळी गाठली होती. किमान तापमानात दोन अंशांनी वाढ होऊन ते १६.६ अंशांवर पोहोचले होते. शीतलहरी वाऱ्यामुळे दुपारपर्यंत बोचरी थंडी जाणवली. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी गरम कपडे घालूनच बाहेर पडणे पसंत केल्याचे दिसून आले.

 

मंगळवारी सकाळी पर्यंत प्रतितास ते १० किमी वेगाने थंड वारे वाहत होते. त्यानंतर वाऱ्याचा वेग कमी होऊन तो सायंकाळपर्यंत सामान्य झाला होता. दिवसभर दाट ढगांचे आच्छादन होते. थंड वाऱ्यामुळे दमट वातावरणाला चाप बसला. आर्द्रता ६५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली होती. थंड, गरम, बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होऊन शहर परिसरात दुपारी, सायंकाळी, रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.


तापमानातील बदलांचे सर्वाधिक परिणाम मंगळवारी जाणवले. दुपारपर्यंत हवेचा वेग खूप वाढला होता. त्यानंतर हलका पाऊस झाला. बदलाचे मानवी आरोग्याबरोबरच वन्यजीव, कपाशी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला, फळबागांवर दुष्परिणाम होत आहेत.

 

आज स्थिती पूर्णपणे निवळणार
बुधवारीसायंकाळपर्यंत ओखी वादळ त्यामुळे निर्माण झालेली स्थिती पूर्णपणे निवळणार आहे. मात्र, बंगालच्या उपसागरावर पुन्हा चक्रीवादळ तयार होत असून डिसेंबरपासून त्याचे रूप बघायला मिळेल. त्यामुळे ११ डिसेंबरला नांदेड, परभणी, बीड, पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील अतिशीत वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...