आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगण्याची धडपड: औरंगाबादेतील सिंहिणीला घास भरवण्याची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील एक सिंहीण आणि एक तरस वयोमानानुसार थकले असून त्यांना जगवण्याची धडपड सुरू आहे. 23 वर्षांच्या रोहिणी या सिंहिणीला घास भरवण्याची वेळ आली आहे, तर एका वृद्ध तरसाने अन्नपाणी सोडले आहे.

आबालवृद्धांचे आकर्षण असणार्‍या प्राणिसंग्रहालयात 286 प्राणी आहेत. या प्राण्यांची देखभाल हा कायमच मोठा प्रश्न बनला आहे. या प्राण्यांना अधूनमधून विविध साथींमुळे आजारपणे सुरू असतात. काही प्राणी वृद्ध झाले आहेत, तर काहींना आजारांनी ग्रासले आहेत. मागील सहा महिन्यांत सहा प्राण्यांचा मृत्यू झाला. या महिन्यातच न्यूमोनियाने तीन नीलगायींचा लागोपाठ मृत्यू झाल्याची घटना घडली. वृद्धापकाळाने आता आणखी दोन प्राणी मृत्यूच्या दिशेने सरकत आहेत. 23 वर्षांच्या रोहिणीचा प्राणिसंग्रहालयातच जन्म झाला. जहाँगीर आणि तारा या सिंहांच्या जोडप्यापासून ती जन्मली. ती आता थकली असून मागील काही दिवसांपासून तिने आपणहून खाणे बंद केले होते. पिंजर्‍यता बसून राहणार्‍या या सिंहिणीला ताकद यावी यासाठी टॉनिक दिले जात असून खिमा हाताने भरवावा लागत आहे. तिचा आहारही कमी झाला आहे, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले. येथीलच एक 25 वर्षांची तरस मादी गंभीर असून तिने अन्नपाणी सोडले आहे. प्राणिसंग्रहालयात एकूण तीन तरस आहेत.

या महिन्यात प्राणिसंग्रहालयात असणार्‍या 11 नीलगायींपैकी तीन गायी 12, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी मरण पावल्या. या तिन्ही नीलगायींचे वय साधारण दीड वर्षाचे होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार न्यूमोनिया आणि विषाणू संसर्गामुळे या नीलगायींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते