आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट कार्यालयाला जुन्या मतदार ओळखपत्रांची अ‍ॅलर्जी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पासपोर्ट काढण्यासाठी सादर करावयाच्या कागदपत्रांमध्ये मतदार ओळखपत्र हे महत्त्वाचे आहे, पण ज्या ओळखपत्रांवर एमटी हे शब्द आहेत, त्या जुन्या मतदार ओळखपत्रांचा यासाठी उपयोगच होत नाही. कारण ही ओळखपत्रे सध्याच्या स्थितीत पासपोर्ट कार्यालयाच्या वेबसाइटवर ‘इनव्हॅलिड’ दाखवले जातात. म्हणून पुढचा फॉर्मच भरला जात नाही. त्यामुळे ज्यांना पासपोर्ट काढायचा आहे ते नागरिक चांगलेच अडचणीत आले आहेत.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील अनेक लोक विदेशात जातात. तत्पूर्वी, त्यांना पासपोर्ट काढावा लागतो. यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मतदार ओळखपत्र महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

नेमका घोळ काय? : सन 2000 पूर्वी नागरिकांना मतदार ओळखपत्र देण्यात आले. जिल्ह्याला निवडणूक विभागाने 193 हा क्रमांक दिला होता. याबरोबरच अनेक मतदारांच्या ओळखपत्रावर टळ/33/193 असे लिहून पुढे मतदारांचा क्रमांक टाकण्यात आला. पासपोर्ट कार्यालयातील वेबसाइटवर आॅनलाइन फॉर्म भरताना मतदार ओळखपत्रावरील एमटीपासून सुरू होणारा क्रमांक टाकल्यास तो ‘इनव्हॅलिड’ दाखवला जातो. पासपोर्ट संदर्भातील
www.passportindia.org.in या वेबसाइटवर फॉर्म भरता येत नाही. सध्याच्या स्थितीत निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्ह्याच्या मतदारसंघाचा 193 क्रमांक बदलून 107, 108, 109 क्रमांक दिला आहे. टळ/33/193 या क्रमांकाचे असंख्य कार्ड वाटप करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात मतदारांकडे जुन्याच क्रमांकाची ओळखपत्रे असल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एमटी या इंग्रजी मुळाक्षरांनंतर स्लॅश असल्यामुळे वेबसाइटवर हे ओळखपत्र अधिकृत मानले जात नाही.

ओळखपत्र बदलण्याची मागणी : या प्रकारामुळे ही जुनी मतदार ओळखपत्रे बदलून नवी देण्याची व्यवस्था जिल्हा निवडणूक विभागाने करावी, अशीही मागणी होत आहे.
४पासपोर्ट काढण्यासाठी मतदार ओळखपत्र देण्यात आले होते. त्यावर एमटी क्रमांक व स्लॅश असल्यामुळे आॅनलाइन फॉर्मच भरता येत नाही. आमचे ओळखपत्र इनव्हॅलिड असल्यामुळे पासपोर्ट कार्यालयात ते अधिकृत मानले जात नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने असे ओळखपत्र बदलून आमच्यासारख्यांना नवी ओळखपत्रे दिली पाहिजेत. -जुल्फेकार हुसेन, नागरिक

- एमटी क्रमांक असलेल्या मतदारांनी आमच्याकडे नवीन ओळखपत्रासाठी रीतसर अर्ज केले, तर आम्ही त्यांना नवीन ओळखपत्र देऊ. तसेच संपूर्ण मतदारसंघात अशी मोहीम राबवावी यासाठी मी वरिष्ठांशी चर्चा करतो. आनंद बोबडे, नायब तहसीलदार, निवडणूक विभाग