आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मित्र-मैत्रिणी चार दशकांनी भेटल्याने दाटून आल्या भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शालेय जीवन हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सुखद टप्पा असतो. जीवनात परत एकदा तरी हा टप्पा अनुभवण्यास मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. रविवारी शाळेतील ‘त्या’ मित्रांसोबत परत एकदा ते क्षण अनुभवले रा. ति. काबरे विद्यालय एरंडोल येथील 1973 च्या बॅचने. या वेळी 40 वर्षांतील अनुभव कथन करताना अनेक जण गहिवरले होते.
डॉ. रवि महाजन व रेखा महाजन यांच्यातर्फे रविवारी आर्यन पार्क येथे अनोख्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी 1973च्या आपल्या वर्गमित्रांना आमंत्रित केले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तब्बल 40 वर्षांनंतर भेटलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी आयुष्याचा चित्रपटच उलगडला. शाळेतील मस्ती, मैत्रीचे नाते, अभ्यास, सुख -दु:खातील आणि शिक्षकांबाबतची कृतज्ञता सगळ्यांचे किस्से चांगलेच रंगले होते. त्यामुळे साºयांनाच आपण पुन्हा बालपणात असल्याचा भास होत होता. कार्यक्रमास औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती, शिरपूर, नंदुरबार, जळगाव, पाचोरा, एरंडोल, भुसावळ आदी ठिकाणांहून 85 विद्यार्थी आले होते. या मित्रांनी अनेक प्रकारचे खेळ खेळले. यात रेन डान्सची मजा तर वेगळीच होती.
शिक्षक, सेवक गहिवरले
सहकुटुंब सहपरिवार आलेल्या या मित्रांनी आपल्या शिक्षकांचा अन् सेवकांचा सत्कार केला. वयाची सत्तरी ओलांडलेले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाखातर कार्यक्रमास आले होते. सत्काराने भारावलेल्या अनेक शिक्षकांना गहिवरून आले. तर सेवकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.