आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठांनी गिरवले चॅटिंग, बँकिंगचे ऑनलाइन धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आस्था फाउंडेशन आणि एमकेसीएलच्या (महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन) सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी एमएस - सीआयटी संगणक मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच श्रेयनगर येथील अल्फा आयडियल स्कूल येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत ५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यानंतर एमकेसीएलच्या वतीने संगणकाविषयी तसेच नातवंडांशी चॅटिंग, ऑनलाइन बँकिंग व्यवहार, ऑनलाइन बिल भरणेे, ऑनलाइन तिकीट बुक करणे, ऑनलाइन देवस्थानाचे दर्शन घेणे, जुनी गाणी डाउनलोड करणे आदींचे प्रात्यक्षिक करून दाखवले. याशिवाय एमएस - सीआयटी कोर्सविषयी सविस्तर माहिती सांगितली.

आस्था फाउंडेशनचे सुरेश करकरे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी आस्था फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष गिरीश हंचनाळ, एमकेसीएलचे विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, नीलेश झाल्टे यांची उपस्थिती हाेती. एमकेसीएलचे विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा यांनी संगणक शिकणे हे सर्वांसाठी किती आवश्यक आहे, हे पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुणचंद्र शास्त्री, जयंत सांगवीकर, रवी कुलकर्णी, अभय भाले, पी. पी. कुलकर्णी, पी. एन. कुलकर्णी, अविनाश जोशी, अनिल मालुसरे यांनी परिश्रम घेतले.