आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्दू पुस्तक मेळाव्यात शंभर वर्षे जुनी पुस्तके; संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्वणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमखास मैदानावरील उर्दू पुस्तक मेळाव्यात शंभर वर्षे जुन्या पुस्तकांचा खजिना उपलब्ध असून वाचकांसाठी, विशेषत: संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

पुस्तक मेळाव्यात देशभरातून पुस्तक विक्रेते आले आहेत. विदर्भातील अकोला येथील रियान इस्लामिक हेरिटेज फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरच्या स्टॉलवर शंभर वर्षांपूवीची पुस्तके आहेत. ही पुस्तके विकली जात नसून ती पेनड्राइव्हमध्ये दिली जात आहेत. तसेच काही पुस्तकांच्या झेरॉक्सही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे जुनी पुस्तके वाचणाऱ्यांना चांगली संधी आहे.
अशी आहेत जुनी पुस्तके : अल्बर्ट आइन्स्टाइन.. उर्दू भाषांतर, टिपू सुलतान, गीता अमृत, ओम..उर्दू भाषेत हिंदू स्टडीज, मराठ्यांचा इतिहास, बाबा-ए-उर्दू रिसालत, अल हिलाल, सच.

संशोधकांनी नोंदवली नावे
ज्यांना उर्दू भाषा येत नाही, परंतु त्यांना संशोधनासाठी त्या विषयाची माहिती हवी असेल तर रियान फाउंडेशन ती माहिती ज्या भाषेत हवी ती उपलब्ध करून देते. त्यामुळे संशोधकांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

भाषांतराची व्यवस्था
रियान रिसर्च फाउंडेशनने त्यांची एक वेबसाइट तयार केली असून वेबसाइटवर हव्या त्या भाषेत संबंधित विषयाचे भाषांतर करून मिळणार आहे.

^मला स्वत:ला जुने पुस्तक मिळत नव्हते. त्या वेळी माझ्या डोक्यात विचार आला आणि मी स्वत: जुनी पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे याचा संशोधकांनाही चांगला फायदा होत आहे. डॉ. वसीम खान, रियान रिसर्च सेंटर