आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीच्या बहाण्याने वृद्धेची चौदा हजारांची पोत लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माझे वडील गरिबांना मदत करतात. तुम्हालाही दहा हजार रुपये देतो, अशी थाप मारून निर्मनुष्य परिसरात नेत वृद्धेची १४ हजार रुपयांची सोन्याची पोत आणि रोख रक्कम ४०० रुपये हडप केल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मिल कॉर्नर ते जुना बाजारादरम्यान घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
सुगराबी शेख नूर (६०, रा. पडेगाव) या १७ ऑक्टोबर रोजी सकाळी मिल कॉर्नर येथून रिक्षातून उतरून बायजीपुऱ्यात पायी जात असताना अनोळखीने त्यांना अडवले. माझे वडील गरिबांना मदत करतात. मी त्यांच्याकडून तुम्हाला दहा हजार रुपयांची मदत मिळवून देतो, असे म्हणत थोड्या अंतरावर नेत त्यांच्याकडील पोत रोख रक्कम पिशवीत ठेवून पसार झाला. फसवणूक झाल्याचे कळल्यावर सुगराबी यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 
पुंडलिकनगरातही वीस दिवसांपूर्वी अशी घटना पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एन-४ मध्ये अशाच प्रकारे दाेन वृद्ध महिलांकडून १५ हजार रुपये लुटले होते. परंतु या प्रकरणातील अद्यापही आरोपींचा शोध लावण्यात पुंडलिकनगर पोलिस तसेच गुन्हे शाखेला यश आलेले नाही. 
बातम्या आणखी आहेत...