आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणींमध्येही ऑलिम्पिक फीव्हर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सध्या ऑलिम्पिकची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शहरातील तरुणींमध्येही या स्पध्रेबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. या स्पध्रेत भारत 13 खेळांमध्येच सहभागी होत असला, तरी अनेक खेळ असे आहेत जे अतिशय एकाग्रतेने पाहिले जात आहेत. यामध्ये जिम्नॅस्टिक, नेमबाजी, कुस्ती, अँथलेटिक अशा विविध खेळांचा समावेश आहे.
भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे या तरुणींचे लक्ष आहेत. आपले खेळाडू कुठे कमी पडतात, त्यासाठी काय करायला हवे याविषयीच्या सकारात्मक चर्चादेखील महाविद्यालयांत रंगलेल्या दिसून येत आहेत. सातत्याने अभ्यासामध्ये मग्न असलेल्या अभियांत्रिकी, बीसीएसच्या विद्यार्थिनींचे ऑलिम्पिककडे विशेष लक्ष आहे. भारताच्या गगन नारंगने बाँझपदक पटकावले. मात्र, नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी इतर खेळाडूंची ऊर्जा खूपच कमी पडत आहे. बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी, कुस्ती, रोइंग, ज्युदो, हॉकी, स्विमिंग, वेटलिफ्टिंग, अँथलेटिक्स, टेनिस, टेबलटेनिस अशा विविध खेळांमध्ये आपले खेळाडू प्रदर्शन करीत आहेत.
ऑलिम्पिक खेळांचे वलय काही औरच - ऑलिम्पिक खेळांची प्रतिमा काही निराळीच आहे. जगभरातील सवरेत्तम खेळाडू या स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करतात. आम्ही रोज ऑलिम्पिक पाहतो, प्रेक्षकांतील एक मुलगी रडत असल्याने अभिनव बिंद्राची एकाग्रता ढळली. खेळावर भावनांचा मोठा परिणाम होतो, तोच ब्रिंदाच्या प्रदर्शनावर दिसून आला. हा अत्यंत भावनिक क्षण होता. मात्र, त्यामुळे आपले सुवर्णपदक हुकले.’’ पूजा महिंदळेकर
ऑलिम्पिक खेळाची नशा सर्व जगभरात आहे. सर्वजणच त्याकडे लक्ष लावून बसले आहे. दरदिवशी आपल्या देशाच्या पदकांच्या तालिकेत काय बदल होत आहे, हा उत्सुकतेचा विषय आहे. मात्र, आपल्या देशाच्या तालिकेत फारसा फरक पडत नाही. सातत्याने खेळाडूंची कामगिरी खालावत आहे; पण यातील प्रत्येक स्पर्धा टी.व्ही.वर पाहणे रोमांचक अनुभव आहे.’’ रम्या गारेमने
जिम्नॅस्टिकचे प्रदर्शन सवरेत्तम - मी शाळेमध्ये असताना फुटबॉल खेळायचे. काल ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकच्या मॅचेच बघितल्या. जिम्नॅस्टिक हा अतिशय कौशल्याचा खेळ आहे त्यात भारतातर्फे कु णी खेळले नाही; पण ते प्रदर्शन अतिशय रोमांचक होते.’’ अमूल्या लहाने