आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिका-यांची उद्या डीएमआयसीबाबत शेतक-यांशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉरच्या (डीएमआयसी) भूसंपादनाचा वाद सोडवण्यासाठी नवे जिल्हाधिकारी विक्रमकुमार शुक्रवारी (15 फेब्रुवारी) बिडकीन परिसरातील शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. सकाळी 11 वाजता जिल्हाधिका-यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. मोबदल्याबाबतचा वाद मिटवण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले होते. आता ही चर्चा अंतिम टप्प्यात असून या बैठकीतून तोडगा निघण्याची शक्यता आहे. कुणालकुमार जिल्हाधिकारी असताना त्यांनी येथील शेतक-यांशी तीन वेळा चर्चा केली होती. शासनाने 18 लाख रुपये इतका दर प्रतिएकरासाठी मान्य केला असून, शेतकरी 21 लाखांवर अडून बसले आहेत. करमाड येथील शेतक-या ना तेवढाच दर दिला आहे. तेवढाच दर आम्हालाही द्यावा, असे शेतक-या चे म्हणणे आहे, तर करमाड येथील जमिनी शहराला लागून असल्याने तेवढा भाव देण्याची तयारी एमआयडीसीने जिल्हाधिका-या मार्फत दर्शवली होती.