आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 एप्रिलनिमित्त वाहतुकीत बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमित्त 14 एप्रिल रोजी शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून पर्यायी रस्ते खुले करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी मंगळवारी बदलाचे आदेश काढले. यानुसार 14 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 15 एप्रिल रोजी मिरवणूक संपेपर्यंत हे बदल कायम राहणार आहेत.


हे रस्ते राहतील बंद
*क्रांती चौक - सिल्लेखाना- पैठण गेट- बाराभाई ताजिया - गुलमंडी - रंगारगल्ली, मच्छलीखडक ते सिटी चौक
*शहागंज - सराफा - सिटी चौक - जुना बाजार ते भडकल गेट
*मिलकॉर्नर - खडकेश्वर - औरंगपुरा चौकी ते बाराभाई ताजिया
*आण्णाभाऊ साठे चौक - लेबर कॉलनी - फाजलपुरा
गोपाल टी ते क्रांती चौक
*लोखंडी पूल - बाबा पेट्रोल पंप ते केंब्रिज स्कूल हा रस्ता सर्व जड वाहनासाठी येण्याजाण्यासाठी बंद
*एन 12 नर्सरी - गोदावरी पब्लिक स्कूल - आण्णाभाऊ साठे चौक- टी.व्ही. सेंटर- एन 9- एम 2 - अयोध्यानगर- शिवनेरी कॉलनी - एन 7, सिडको शॉपिंग सेंटर या मार्गावरील एकेरी मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद