आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवानिमित्त आज भव्य रांगोळी, उखाणे स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी यंदा “दिव्य मराठी’च्या “मधुरिमा क्लब’तर्फे खास कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, स्वाद व्हेज रेस्टॉरंटचे चिंतन शहा आणि ओरो कॅबचे जितू मोटवानी यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक मंडळे आणि महिलांसाठी गणेशोत्सवातील पहिली भव्य रांगोळी उखाणे स्पर्धा मंगळवारी (६ सप्टेंबर) दुपारी वाजता आयोजित करण्यात आली आहे. झांबड इस्टेट, श्रेयनगर येथील मीनाताई ठाकरे सभागृहात ही स्पर्धा रंगणार असून प्रथम तीन विजेत्या महिलांना स्मार्टफोन बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धां सहकार्यक्रमांची रेलचेल : “मधुरिमाक्लब’तर्फे अन्य स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या असून सर्वोत्कृष्ट ढोल पथक स्पर्धा १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रोझोन मॉल येथे घेण्यात येणार आहे. शहरासह राज्यभरातील ढोल पथकांनी नोंदणी करून प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहता ढोल पथकांचा चांगलाच कस लागणार आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता प्रोझोन मॉल येथेच मोदक लाडू बनवण्याची स्पर्धा होणार असून मिनिट गेम शोचेही आयोजन करण्यात आले आहे.

गणपती सजावट स्पर्धा : सर्वोत्कृष्ट गणपती सजावट आणि सर्वोत्कृष्ट इको-फ्रेंडली गणेशमूर्ती या स्पर्धेसाठी घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळांना सहभागी होता येईल. सजावट केलेले एक छायाचित्र दैनिक दिव्य मराठी कार्यालयात आणून द्यायचे आहे. या सर्व स्पर्धांसाठी प्रोझोन मॉल, एस.एस. प्रो आणि नॉर्थन प्रो लाइट्स यांचे सौजन्य लाभले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी दिव्य मराठी (८३९०९०७८२०) आणि औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाचे बाळासाहेब औताडे (९५०३६२७७७७), बबलू वानखेडे (९४२०८७७७७८) यांच्याशी संपर्क साधावा.

रांगोळी स्पर्धेचे नियम अटी
रांगोळीस्पर्धेचा प्रवेश सर्वांसाठी खुला असून सहभागी प्रत्येक महिलेला रांगोळी काढण्यासाठी बाय फूट जागा दिली जाईल. सर्व प्रकारच्या रांगोळ्या या स्पर्धेसाठी पात्र राहतील. रांगोळी काढण्यासाठी सर्व स्पर्धकांना ४५ मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धक महिलांना रांगोळीसाठीचे रंग सोबत आणावे लागतील. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम तीन महिलांना ओरो कॅबचे जितू मोटवानी यांच्यातर्फे आकर्षक स्मार्टफोन बक्षीस देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...