आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Again Effort For Satara Devlai Induction In Municipal Corporation ?

सातारा-देवळाईच्या मनपा समावेशासाठी पुन्हा जोर ? सेना-भाजपचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई परिसराचा मनपामध्ये समावेश करण्यासंदर्भात दाखल केलेले आक्षेप शासनाने विभागीय आयुक्तांकडे वर्ग केले आहेत. त्यानंतर लगेच या भागाचा मनपात समावेश करण्यासाठी सेना-भाजपने जोर लावला असून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रकरण निकाली काढण्यासाठीचे प्रयत्न राजकीय पातळीवर सुरू झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सातारा-देवळाईच्या अस्तित्वाचे घोंगडे भिजलेलेच आहे. महिनाभरात निर्णयाचे वेगवेगळे वारे वाहत असतानाच सरकारने पुन्हा शासकीय पातळीवर मनपा समावेशासाठी प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबलच कमी झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नगरविकास खात्याने सातारा-देवळाई नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. त्यामुळे सर्वांच्याचा आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, मनपा निवडणुका पार पडताच सरकारने या परिसराच्या समावेशासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परिसरातील भाजपचा एक गट मनपा समावेशाच्या विरोधात असून दुसरीकडे भाजपसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनपामध्ये समावेशाला पाठिंबा दिला आहे.

समावेशाचा नेमका फायदा तरी काय ?
गेल्या पाच महिन्यांपासून सातारा-देवळाईचा निर्णय बदलत आहे. आधी नगर परिषद, नंतर मनपा, तर पुन्हा नगर परिषद व आता मनपाची चर्चा सुरू झाली. सातारा-देवळाईच्या अस्तित्वाविषयी प्रशासनाचा व राजकारण्यांचा नेमका फायदा तरी काय आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.

भाजपचा पाठिंबा
सातारा-देवळाईचा मनपामध्ये समावेश करण्यासाठी आमचा कायम पाठिंबाच आहे. नागरिकांना यासंदर्भात आधी विश्वासात घेऊनच त्यानंतर यासाठी प्रयत्न करणार आहे. नाराज कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका समजावून त्यांची नाराजी दूर केली जाईल.
शिरीष बोराळकर, प्रवक्ते, भाजप

मनपा उत्तम
सातारा-देवळाईला पाणी, रस्ते लवकरात लवकर उपलब्ध करून देणे हे आहे. त्यासाठी महानगरपालिकाच हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे मनपात समावेश करण्यासाठी शिवसेनेचा कायम पाठिंबा असून प्रक्रिया लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.
संजय शिरसाट, आमदार, शिवसेना