आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एकपात्री'तून मांडला आदर्श जीवन प्रवास, उलगडले अहिल्याबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्श जीवनातील व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवणारा एकपात्री नाट्यप्रयोग प्रा. डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी सादर केला. प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गीता भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांना भारावून टाकले.

धैर्याने आयुष्यातील प्रत्येक संकटाला सामोऱ्या गेलेल्या अहिल्याबाई होळकर यांचे संपूर्ण जीवन आदर्श आहे. प्रतिकूल परिस्थितीतही हसत खेळत आयुष्याला सामोरे जाताना त्यांनी दाखवलेले अचाट सामर्थ्य त्यांच्यातील वेगळेपण दाखवणारे होते. एकपात्री प्रयोगात डॉ. कुलकर्णी यांनी विविध महत्त्वपूर्ण दृश्ये दाखवून उपस्थितांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे बारकावे, े२विचारांची दिशा दाखवून दिली. प्रत्येकाच्या मनात स्फूर्ती भरणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांचे कौशल्यही वाखाणण्याजोगे होते. त्यांनी केलेल्या या सादरीकरणातून अहिल्यादेवींचा खडतर जीवनप्रवास सर्वांमध्ये ऊर्जा भरून गेला. यानंतर भक्तिपर्व गुंफणारा स्नेहल अभ्यंकरांचा कार्यक्रम दाद मिळवून गेला. भावगीत, भक्तिगीत, गवळण यामधून सभागृहात चैतन्य संचारले. संस्थाध्यक्ष श्रीकिशन शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लक्ष्मीकांत राळेगणकर यांनी संवादिनीवर, तर गिरीश सातोनकर यांनी तबल्यावर साथ केली. श्रीराम जोशी यांनी निवेदनाची साथ केली. स्मिता कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आर. पी. दुसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्याम जावळीकर यांनी आभार मानले.
गायनकौशल्याची चुणूक
तुझा नि माझा एक गळा, आज कुणी तरी यावे अशा सुगम गीतांनी कार्यक्रमाचा सुरेल प्रवास सुरू झाला. नाट्यसंगीताची पदे सादर करताना सामर्थ्यपूर्ण गायनकौशल्याची चुणूक अभ्यंकर यांनी दाखवली. कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम, जोहार मायबाप जोहार, एक धागा सुखाचा अशा आशयसंपन्न गाण्यांनी बहारदार कार्यक्रमाची सांगता झाली.