आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One And Half Hour Heavy Rain Fall In Aurangabad, 42 MM Rain Recorded

दीड तासात औरंगाबादेत मुसळधार सरी बरसल्या, 42 मिमी पाऊसाची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहराला सोमवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजेच्या कडकडाटासह दीड तासात 42 मि.मी. पाऊस पडला. चार वर्षांतील पावसाचे आजवरचे सर्व विक्रम यामुळे मोडीत निघाले. रोहित्रावर पाऊस कोसळल्याने शहरातील गारखेडा परिसर, चिकलठाणा, एन 2, मुकुंदवाडी भागात 12 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. सिल्लोड, सोयगाव, खुलताबादेतही हा पाऊस पडला.
पाणीच पाणी, वीज गुल
०मुकुंदवाडी, चिकलठाणा, गारखेडा परिसरात वीजपुरवठा खंडित. नागेश्वरवाडीत अंजली टॉकीजसमोरील पुलावरून पाणी वाहिले
०गुलमंडी, पैठणगेट, औरंगपुरा, गारखेडा परिसर, स्वप्ननगरी, सातारा परिसर, टीव्ही सेंटर, हर्सूल, जटवाडा, पडेगाव, विष्णुनगरात तळी साचली
०पार्वती कन्या शाळेजवळ विजेच्या मुख्य वाहिनीवर झाड पडल्याने रात्री 10.30पासून वीज गुल राहिली.
थंडी पळाली : किमान तापमान 12.7 अंशांवरून 18.6 अंश, तर कमाल 30.2 अंशांवर पोहोचले आहे.