आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेतील बेटिंगचा सूत्रधार दिल्लीत जेरबंद, विदेशी सट्टेबाजांशीही कनेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयपीएल सट्ट्यातील सूत्रधार, मुख्य बुकी अमित बाली याला औरंगाबाद पोलिसांनी रविवारी दिल्लीत अटक केली. शहरात पकडलेल्या सर्व बुकींना तो सूचना देत होता, असे तपासात निष्पन्न झाले होते. तेव्हापासून गुन्हे शाखेचे पोलिस त्याच्या पाळतीवर होते. या प्रकरणात अटक केलेला हा नववा आरोपी आहे. त्याला पकडण्यासाठी गेलेले पथक सोमवारी सकाळपर्यंत शहरात पोहाेचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहरात पकडलेल्या आठ बुकींचे कॉल डिटेल्स तपासले. त्यावरून विविध राज्यांच्या बुकींशी बालीचा संपर्क असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला गेले असता त्याचे धागेदोरे मिळाले. त्याच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनीही मदत केली. दिल्ली पोलिसांनी शनिवारीच त्याला अटक करून गुन्हे शाखेच्या हवाली केले.
बालीचे विविध राज्यांच्या बुकींसह परदेशातील सट्टेबाजांशीही सबंध आहेत. त्याच्या चौकशीतून बुकींचे अर्थकारण आणि यापुढचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
बातम्या आणखी आहेत...