आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली. दीपक गंगातिवरे (रा. गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे. 

गारखेडा परिसरातील शिवाजीनगर रस्त्यावर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी एका पाच वर्षांच्या मुलीवर मजुरी करणारा आरोपी गंगातिवरे याने दुपारी तीन वाजेच्या सुमारास अत्याचार केला. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपीला सोमवारी सूतगिरणी चौकातील देशी दारूच्या दुकानावरून सायंकाळी सात वाजता अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी आरोपीच्या ओळख परेडसाठी न्यायालयीन कोठडीची विनंती केली. न्यायालयाने विनंती मान्य करून वरीलप्रमाणे आदेश दिला. 
बातम्या आणखी आहेत...