आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून मित्रावर प्राणघातक हल्ला, दारूपाजून केला कुऱ्हाडीने वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - एकाने दारूपाजून मित्रावर कुऱ्हाडीने वार केले. ही घटना २७ एप्रिल रोजी राजोरा (ता. गंगापूर) येथे घडली. सुनील रामचंद्र बोबडे (२५) याने बुधवारी रात्री ८.३० वाजता त्याचा मित्र सूरज रामहरी सावंत (२२) याला फोन करून घरी बोलावून घेतले. सुनीलने सूरजला जास्त दारू पाजली. नशा चढताच त्याने माझ्या पत्नीशी तुझे अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत भांडण सुरू केले. काही वेळातच कुऱ्हाडीने सूरजच्या डोक्यावर वार केला.
गंभीर जखमी सूरजला त्याच्याच दुचाकीला (एमएच २० एझेड ७३४४) दोरीने बांधून शेतात फरपटत नेले. आरडाओरड करणाऱ्या सूरजचा आवाज ऐकून लगतच्या शेतातून दत्तू बडे इतर शेतकरी मदतीला धावले. त्यांना पाहून सुनीलने तेथून पळ काढला. गंभीर जखमी सूरजवर घाटीत उपचार सुरू आहेत.
पुढे वाचा... तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या गळफास, ट्रॅक्टरमधून पडल्याने तरुणाचा अंत